शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई केंव्हा मिळणार ?

By admin | Updated: July 2, 2014 00:31 IST

कुंडलवाडी : मौजे पिंपळगाव (कु़) येथील २०१३-१४ च्या खरीप हंगामातील तोंडावर आलेले सोयाबीन, उडीद, मूग हे अतिवृष्टीत हातचे गेले़

कुंडलवाडी : मौजे पिंपळगाव (कु़) येथील २०१३-१४ च्या खरीप हंगामातील तोंडावर आलेले सोयाबीन, उडीद, मूग हे अतिवृष्टीत हातचे गेले़ तर फेब्रुवारी १४ मध्ये झालेल्या गारपीटीने कापणीला आलेले पिके जमीनदोस्त झाली़ या घटनेचा शिवार फेरी न करताच तलाठ्याने परस्पर यादी करून तहसीलदार बिलोली यांच्याकडे अहवाल पाठविला, असा आरोप आहे.परिणामी गारपीटग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई शासनाकडून न मिळाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी सदर तलाठ्यास निलंबनाची मागणी करीत नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन बिलोली तहसीलदारांना दिले़शासनाने माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेती व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत असून नैसर्गिक आपत्ती गावनिहाय याद्या तयार करून, शासनपत्रात नमुद प्रमाणे लाभार्थ्यांची यादी प्रत्येक गावात चावडी, ग्रामपंचायत, कृषी सहाय्यक यांचे कार्यालयीन सूचना फलकावर ठळकपणे प्रसिद्ध करण्यात यावी, त्याचा प्रसिद्धी पंचनामा व अनुपालन तत्काळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश देवूनही पिंपळगाव (कु़) चे तलाठी देवकांबळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतपाहणी न करताच लाभार्थ्यांच्या याद्या परस्पर तयार करून पाठविल्याने खरा लाभार्थी हा गारपीट अनुदानापासून आजतागायत वंचित राहिला़ हा गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय असून कहर म्हणजे यादी नुकसानग्रस्तांची नावे समाविष्ट करण्यासाठी देवकांबळे यांनी पैशाची मागणी केल्याचेही निवेदनात नमूद केले आहे़सदर प्रकरणाची येत्या २९ जून १४ पर्यंत चौकश्ी करून तलाठी देवकांबळे यांना निलंबित करावे व वंचित गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा येत्या ३० जून १४ रोजी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय बिलोली येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे़ निवेदनावर संभाजी धर्मपुरे, प्रताप भिंगे, सुधाकरराव कन्ने, जानिमियाँ इस्माईलसाब, मारोती हिवराळे, मारोती मदनुरे, गंगाधर मारोती, भिंगे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत़ (वार्ताहर)