आता काय करायचे? वनविभागाच्या कार्यालयासमोरील चिखलात अडकले स्ट्राईक फोर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:32 IST2025-06-26T19:32:39+5:302025-06-26T19:32:49+5:30

कर्मचारी आणि अधिकारी यांना घटनास्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. 

What to do now? Strike force stuck in the mud in front of the forest department office! | आता काय करायचे? वनविभागाच्या कार्यालयासमोरील चिखलात अडकले स्ट्राईक फोर्स!

आता काय करायचे? वनविभागाच्या कार्यालयासमोरील चिखलात अडकले स्ट्राईक फोर्स!

छत्रपती संभाजीनगर : संकटात सापडलेले वन्य प्राण्यांची सुटका, वन्यजीव रक्षण, जंगलातील अनधिकृत हालचालींवर नियंत्रण, आपत्कालीन घटना यासाठी सदैव तत्पर असलेल्या स्ट्राईक फोर्सचे वाहन वनविभागाच्या आवारात झालेल्या चिखलात गेल्या वर्षभरापासून रुतले आहे. एवढेच नव्हे तर चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कार्यालयात पाणी तुंबले आणि या पाण्यातूनच जात येत कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते आहे.

शिक्षण मंडळासमोर असलेल्या या कार्यालयाच्या परिसरात नाले असल्यामुळे पावसात पूर येतो व पाणी साचून राहते. पूर ओसरल्यावर कार्यालयाच्या फरशीवर चिखल आणि मातीचे थर कायम आहेत. या कार्यालयाच्या ताफ्यातील एकमेव शासकीय वाहन गेली चार वर्षे निकामी आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी यांना घटनास्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. 

हे कर्मचारी ‘स्ट्राईक फोर्स’चे शिलेदार असून, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात विविध भागामध्ये बिबट्या व वन्य जीव नागरी वसाहतीत येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही अडचणी निवारण करण्यासाठी पथकाला जावे लागते अशा प्रसंगी वाहनाची अडचण भासते.

प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविणार ..
जुन्या झालेल्या गाडीच्या दुरुस्तीसाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. ती लवकरच दुरुस्त होईल. तसेच, नव्या सुविधा असलेल्या नूतन कार्यालयासाठी प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविणार आहोत.
- उपवनसंरक्षक सुवर्णा माने

Web Title: What to do now? Strike force stuck in the mud in front of the forest department office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.