कार सिग्नलवर उभा करून गेले झोपी; मद्यधुंद मनपा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 16:34 IST2021-04-30T16:33:46+5:302021-04-30T16:34:44+5:30

दोन्ही कर्मचारी महावीर चौक परिसरातील रस्त्यावर कार उभी करून दारूच्या नशेत झोपले होते

went to sleep by car standing at the signal; Filed a case against drunken Aurangabad corporation employees | कार सिग्नलवर उभा करून गेले झोपी; मद्यधुंद मनपा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

कार सिग्नलवर उभा करून गेले झोपी; मद्यधुंद मनपा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद : दारूच्या नशेत तर्र होऊन वाहतूक सिग्नलजवळ कार उभी करून कारमध्ये झोपलेल्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध वेदांतनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा नोंदविला.

शिवलिंग रामदास काळे आणि सुभाष दत्तू मोटे, अशी गुन्हा नोंद झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, दोन्ही कर्मचारी महावीर चौक परिसरातील रस्त्यावर कार उभी करून दारूच्या नशेत झोपले होते. ही बाब नाकाबंदीवरील फौजदार राहुल भदरगे यांना समजली. त्यांनी तातडीने तेथे जाऊन कारमध्ये विनामास्क झोपलेल्या दोघांना उठविले. रस्त्यात कार का उभी केली, असे विचारले असता ते मद्यधुंद असल्याचे दिसले. आम्ही मनपाचे कर्मचारी आहोत, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी दमदाटीची भाषा त्यांनी वापरली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
 

Web Title: went to sleep by car standing at the signal; Filed a case against drunken Aurangabad corporation employees