शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी, तलाव कोरडेठाक, जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

केदारखेडा : केदारखेडा व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नसल्याने परिसरातील तलाव, विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही़

केदारखेडा : केदारखेडा व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नसल्याने परिसरातील तलाव, विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही़ पावसाळा सुरु होऊन महिना उलटला असला तरी परिसरातील तलाव, विहिरी अद्यापही कोरड्याठाक आहेत़ गतवर्र्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडला. या पावसामुळे पूर्णा नदीला एक पूरही गेला होता. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता़ कारण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जवळपास सर्व सार्वजनिक विहिरी नदीपात्रात आहेत. या विहिरींची पाणी पातळी चांगल्या प्रमाणात वाढलेली होती़ यावर्षीच्या नुकत्याच झालेल्या पाण्याने सध्या तरी जनावरांची व ग्रामस्थांची पाणी समस्या सुटली आहे़ परंतु पावसाळ्यानंतर बारामाही पाण्यासाठी तलाव, शेतातील विहिरींची पाणी पातळी वाढण्याची गरज आहे़ त्यासाठी जोरदार पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी बोलत आहेत. यावर्षी जून महिन्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वात जास्त पिण्याच्या पाण्याचे हाल ग्रामस्थांचे झाले़. यावर्षी पाऊस न झाल्याने पिण्याची तीव्र टंचाई सुरु झाली आहे. जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. जंगलातील वन्य प्राण्यांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तीही फोल ठरली आहे. पावसाच्या आशेवर करण्यात आलेली पेरणी पूर्णपणे वाया जाण्याची भीती आहे. काही ठिकाणी कोवळी पिके जळण्यास सुरुवात झाली आहे.पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. बाजारात शांतता आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. खरिपात महत्त्वाचे असलेल्या कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली असली तरी या पिकांचे अंकुर फुटत आहेत. गतवर्षी पडलेल्या चांगला पाऊस पडला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करीत ठिबकसंच घेतले. पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठाही आता आटत आहे. आठवडी बाजार शांतता- ग्रामीण भागातील अर्थ व्यवहाराचे प्रमुख केंद्र असलेले आठवडी बाजार गत दोन ते तीन महिन्यांपासून शांतच आहे. पाऊस न पडल्याने बाजारातील उलाढाल कमालीची मंदावली आहे. (वार्ताहर)महिनाभरात जेमतेमच पाऊसपावसाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे़ मात्र जोरदार पावसाचे आगमन चार ते पाच दिवस मिळून एकदा होत असल्याने यावर्षीची पिकांचे उत्पनाविषयी शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ यामुळे रबी पिकांचे क्षेत्र देखील धोकयात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत.आता पडलेल्या पावसावरच रबी पिकांचे भवितव्य अवलंबून असते़ मात्र सध्या या पिकांसाठी सुध्दा जोरदार पावसाची नितांत गरज असल्याचे जाणकार शेतकऱ्यांतून बोलले जात आहे़