शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

रस्त्यावर गुंडगिरी कराल, तर ठाण्यात जाईल नववर्षाची पहाट; पोलिसांची चौकाचौकात नाकाबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:46 IST

नववर्षाचे स्वागत जल्लोषात, पण जबाबदारीने करा; छत्रपती संभाजीनगरात आज रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत दीड हजार पोलिस रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : आज मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करणार असाल, तर जबाबदारीने करा. कारण, शहर पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने टवाळखोर, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे. रात्री ८ वाजेपासून पहाटे ५ पर्यंत १२०० पोलिस रस्त्यांवर ठिकठिकाणी तैनात असणार आहेत. शिवाय, प्रमुख १८ चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहन, चालकांची तपासणी होणार आहे.

गेल्या आठवड्यापासून नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह मोठ्या लॉन्सवर रोषणाई, आकर्षक सजावटीसह पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान, कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, महिलांची छेडछाड, गैरप्रकार टाळण्यासाठी शहर व जिल्हा पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने काटेकोर नियोजन केले आहे.

-जवळपास ११०० पेक्षा अधिक हॉटेल, रेस्टॉरंट्स, बारमध्ये जंगी पार्ट्यांचे आयोजन.-शासनाच्या आदेशानुसार, वाइनशॉप मध्यरात्री १, तर रेस्टारंट, परवाना असलेले बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.-मध्यरात्री १२ वाजेपर्यंत स्पीकरवर गाणे वाजवण्यास परवानगी.-मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीसाठी लाखो रुपयांच्या फटाक्यांची खरेदी.-देश पातळीवरील डीजे, गायक, वादकांच्या सादरीकरणाचे आयोजन.

असा असेल बंदोबस्त- ६८ संवेदनशील ठिकाणी फिक्स पाॅइंट- १८ महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी- ५० पेक्षा अधिक वाहनांतून पोलिसांची फिरती गस्त- गुन्हे शाखा, विषेश शाखेचे साध्या वेशात १० पथके.- ३ पोलिस उपायुक्त, ६ सहायक आयुक्तांसह जवळपास १०० अधिकारी व १२०० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात.

बीडबायपास, केंब्रिज चौक, दौलताबाद परिसरात आयोजन अधिकमुंबई, पुण्याच्या धर्तीवर आता शहरातही प्रसिद्ध डीजे वादक, गायकांच्या ग्रुपला आमंत्रित करून पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. बीडबीपास, नव्याने झालेला सोलापूर धुळे महामार्ग, केंब्रिज चौक ते शेंद्रा, चिकलठाणा एमआयडीसी, दौलताबाद परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वाद टाळण्यासाठी केवळ ‘कपल एंट्री’ संकल्पना म्हणजेच गटात महिला, तरुणी असल्यावरच प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

मद्य परवाना नसलेले ढाबे, हॉटेल टाळा-दारूची अवैध विक्री, परवाना नसताना हॉटेल, ढाब्यावर दारू पुरवठा व सेवन करणाऱ्यांवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सक्त सूचना केल्या आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNew Yearनववर्षCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस