मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाचे करमाडमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:34 IST2019-06-27T21:34:26+5:302019-06-27T21:34:38+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षणाला वैध ठरविल्याच्या निर्णयामुळे करमाड येथे मराठा समाजाने जल्लोष साजरा केला.

मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाचे करमाडमध्ये स्वागत
करमाड : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षणाला वैध ठरविल्याच्या निर्णयामुळे करमाड येथे मराठा समाजाने जल्लोष साजरा केला.
समाजबांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी सरपंच दत्तात्रय उकर्डे, विशाल उकर्डे, भगवान मुळे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा उकर्डे, आनंद पाटील, गजानन मुळे, रामेश्वर सोळुंके, रामेश्वर उकर्डे, उत्तम उकर्डे, अनिकेत उकर्डे, राम उकर्डे, विजय उकर्डे, गजानन उकर्डे, रामदास उकर्डे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
मराठा समाजाला आरक्षणाच्या निर्णयाचे करमाडमध्ये स्वागत करताना समाजबांधव.