स्वागताचे फलक अन् भाजपचे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:33+5:302015-09-02T23:31:33+5:30

पाटोदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणीसाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार म्हटल्यावर उतावीळ कार्यकर्त्यांनी चक्क दुष्काळी दौऱ्याच्या शुभेच्छा

Welcome flags and BJP's flag | स्वागताचे फलक अन् भाजपचे झेंडे

स्वागताचे फलक अन् भाजपचे झेंडे


पाटोदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणीसाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार म्हटल्यावर उतावीळ कार्यकर्त्यांनी चक्क दुष्काळी दौऱ्याच्या शुभेच्छा देणारे फलक सौताडा ते नायगाव दरम्यानच्या मार्गावर लावले होते. याशिवाय नायगाव येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आम्हाला न्याय द्या म्हणत आश्रमशाळेला अनुदान देण्याची मागणी शिक्षक, विद्यार्थ्यांनी केली.
सौताडा येथील दुष्काळी भागाला भेट देऊन मुख्यमंत्री बीडकडे येत होते. या दरम्यान नायगाव येथे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी भाजपचे झेंडे हातात घेऊन आम्हाला न्याय द्या, अशी घोषणाबाजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर केली. दुसरीकडे उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना दुष्काळी दौऱ्याचे शुभेच्छा देणारे मोठमोठे बॅनर (होर्डिंग्ज्) रस्त्याच्या दुतर्फा लावले असल्याचे मार्गावर पहावयास मिळाले. (वार्ताहर)

Web Title: Welcome flags and BJP's flag