वजन १६० किलो पण मातृत्वाची आस; महिलेची गुंतागुंतीची प्रसूती डॉक्टरांच्या प्रयत्नाने यशस्वी

By संतोष हिरेमठ | Published: December 28, 2023 12:10 PM2023-12-28T12:10:47+5:302023-12-28T12:11:23+5:30

३० वर्षीय महिलेस लग्नानंतर आठ वर्षांनी गर्भधारणा झाली.

Weight 160 kg but desire of motherhood; Woman's complicated delivery successful in government hospital | वजन १६० किलो पण मातृत्वाची आस; महिलेची गुंतागुंतीची प्रसूती डॉक्टरांच्या प्रयत्नाने यशस्वी

वजन १६० किलो पण मातृत्वाची आस; महिलेची गुंतागुंतीची प्रसूती डॉक्टरांच्या प्रयत्नाने यशस्वी

छत्रपती संभाजीनगर : तब्बल १६० किलो वजनाच्या महिलेची गुंतागुंत अशी प्रसूती यशस्वी करण्याची किमया शहरातील डाॅक्टरांनी केली. विशेष म्हणजे लग्नाच्या ८ वर्षानंतर महिला आई झाली. आई आणि बाळ या दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. शुभांगी तांदळे - पाळवदे, डाॅ. खुशबू बागडी - कासट यांनी दिली.

शहरातील एका शासकीय संस्थेत ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेस लग्नानंतर आठ वर्षांनी गर्भधारणा झाली. अतिवजनामुळे सोनोग्राफीत गर्भातील बाळ व्यवस्थित दिसत नव्हते. शिवाय प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झाल्यास ऐनवेळी इतरत्र हलविण्याची वेळ आली तर महिलेला उचलायचे कसे, ही चिंता डाॅक्टरांना भेडसावत होती.

या सगळ्या अडचणींवर मात करून शहरातील एका रुग्णालयात डाॅक्टरांनी सिझेरियन प्रसूती यशस्वी केली. डाॅ. शुभांगी तांदळे - पाळवदे, डाॅ. खुशबू बागडी - कासट, भुलतज्ज्ञ डाॅ. प्रियंका मित्तल- गयाळ, डाॅ. दीपक गयाळ, डाॅ. प्रशांत आसेगावकर, डाॅ. पळणीटकर, डाॅ. खटावकर आदींनी यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Weight 160 kg but desire of motherhood; Woman's complicated delivery successful in government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.