शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतही पाणी अपव्यय

By admin | Updated: April 23, 2016 23:54 IST

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे.

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील पाण्याच्या अपव्ययाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.हिंगोलीत चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासाठी तेवढी ओरड नाही. नवीन जलवाहिनी टाकूनही अनेक भागात पुरेसे पाणी नाही. जुन्या वाहिनीवर पाणीपुरवठा होणाऱ्या भागात गळतीत लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आदर्श महाविद्यालय परिसरात नेहमी या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अकोला रोडवर दोन-तीन ठिकाणी गळती होत आहे. नारायणनगर परिसरातही अधूनमधून असे चित्र पहायला मिळते. सिद्धार्थनगरातही असाच प्रकार घडत आहे. एवढेच काय तर हिंगोलीला सिद्धेश्वरहून येणाऱ्या वाहिनीचे व्हॉल्व्हही ठिकठिकाणी गळत आहेत. त्यावर अनेकजण पाणी भरताना दिसतात. त्यामुळे नगरपालिकेने या सर्व प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.शहराच्या नजीकच्या भागात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असताना दुसरीकडे शहरात मात्र अशाप्रकारे पाणी वाया जात आहे. नजीकच्या खेड्यांतही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंधारवाडी, बळसोंडमध्ये गंभीर चित्र आहे. कारवाडी, सुराणानगर आदी भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. हिंगोलीकरांना सध्यातरी ही वेळ आली नसली तरीही पाणी वापराबाबत सजग राहावे लागणार आहे. नळांना तोट्या बसविणेही तेवढेच गरजेचे आहे. सिद्धेश्वरचे पाणीही जोत्याखाली गेल्यातच जमा आहे. येलदरी तर अगोदरच जोत्याखाली गेलेले आहे.