शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

शहराला केवळ एका जलकुंभ पॉर्इंटवरून होतोय पाणीपुरवठा

By admin | Updated: March 28, 2016 00:17 IST

लातूर : लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शहरात ६ ठिकाणी जलकुंभ टँकर पॉर्इंट असले तरी केवळ आर्वी येथील जलकुंभ टँकर पॉर्इंटवरूनच पाणी वितरीत केले जात आहे़

लातूर : लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शहरात ६ ठिकाणी जलकुंभ टँकर पॉर्इंट असले तरी केवळ आर्वी येथील जलकुंभ टँकर पॉर्इंटवरूनच पाणी वितरीत केले जात आहे़ अन्य जलकुंभात पाणी सोडल्यानंतर घट होत आहे़ त्यामुळे सध्यातरी आर्वी येथीलच जलकुंभ पॉर्इंटवरून टँकरद्वारे पाणी वितरण केले जात आहे़ रविवारी या पॉर्इंटवरून ६ हजार लिटर क्षमतेच्या १६६ टँकर फेऱ्या करून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ अन्य जलकुंभ कोरडेच आहेत़हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून बार्शी रोड पाण्याची टाकी, औसा रोडवरील पाण्याची टाकी आणि गांधी चौकातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडता येते़ त्यानुसार हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रात टँकरद्वारे आणलेले पाणी प्रस्तूत जलकुंभात टाकण्यात आले़ परंतू, जलकुंभाच्या मुख्य लाईनवर पाण्याचे मोठ मोठे कनेक्शन असल्यामुळे पाण्याची तुट झाली़ त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून जलकुंभात पाणी टाकण्याचे नियोजन आता बंद करण्यता आले आहे़ परिणामी शहरातल्या केवळ आर्वी येथील जलकुंभातूनच टँकरद्वारे पाणी वितरण केले जात आहे़ हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र ते गांधी चौक, सरस्वती कॉलनी आणि बार्शी रोडवरील पाण्याच्या टाकीत पाणी सोडल्यानंतर निम्म्या पाण्याची तुट होत आहे़ त्यामुळे मुख्य लाईनवरील मोठे कनेक्शन तोडले असले तरी या जलकुंभपॉर्इंटवरून पाणी टँकर भरणा बंद आहे़ त्यामुळे केवळ एका जलकुंभातून पाणी टँकर भरणा करून शहराला पुरवठा केला जात आहे़ ५ लाख लोकसंख्या असलेल्या शहराला एका जलकुंभावरून पाणी टँकरभरणा करून पाणी देण्यास प्रशसनाला कसरत करावी लागत आहे़ रविवारी दिवसभरात ६ हजार लिटर क्षमतेच्या केवळ १६६ टँकर फेऱ्या झाल्या़ ९ लाख लिटर्स पाण्याचे वितरण रविवारी झाले़ एका कुटूंबाला २०० लिटर हा नियम ग्राह्य धरला तरी ८ ते १० हजार कुटूंबांनाच पाणी मिळू शकले़ आर्वी जलकुंभ पॉर्इंटवरून शहराच्या नव्या वस्त्यांना पाणी देणे शक्य आहे़ तर बाभळगाव जलकुंभ टँकर पॉर्इंट सुरु करून जुन्या गाव भागात पाण्याचे वितरण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत़ पुर्ण शहराला व्यवस्थीत पाणी वितरण होण्यासाठी शहरातील सहाही जलकुंभ टँकर पॉर्इंट सुरु होणे आवश्यक आहे़ मात्र शासकीय जलकुंभ टँकर पॉर्इंट, सरस्वती कॉलनी कॉलनी जलकुंभ टँकर पॉर्इंट, गांधी चौक जलकुंभ टँकर पॉर्इंट, नांदेड नाका जलकुंभ टँकर पॉर्इंट, आणि कॉईल नगर जलकुंभ टँकर पॉर्इंट सध्यातरी बंद आहेत़ मनपा प्रशासनाने सहाही टँकर पॉर्इंटवरून पाणी वितरीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले़ परंतू, पाण्याची घट होत असल्याने प्रशासनासमोेर संकट उभे टाकले आहे़मागच्या आठवड्यात हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून ३० लाख लिटर पाणी शहरातील बार्शी रोड, औसा रोड आणि गांधी चौकातील जलकुंभात सोडले होते़ मात्र १२ लाख लिटरच पाणी आले़ निम्या पाण्याची घट झाली़ पाणी गेले कोठे़ याचा शोध घेतला असता हरंगुळ ते गांधी चौक जलकुंभ पॉर्इंटवरील मुख्य लाईनवर कनेक्शन होते़ हे कनेक्शन तोडले नव्हते़ त्यामुळे पाण्याची घट झाली़ ही बाब लक्षात आल्यानंतर ३० ते ३५ कनेक्शन तोडण्यात आले असले तरी या जलशुद्धी केंद्रातून जलकुंभात त्यानंतर सोडले नाही़ परिणामी, सध्या एकाच आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा आहे़