शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याचे रेकॉर्ड कंत्राटदाराच्या हवाली

By admin | Updated: August 26, 2014 01:52 IST

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. १ सप्टेंबरपासून ती कंपनी शहरातील पाणीपुरवठा आणि देखभालीचे काम करणार आहे. १ लाख १० हजार घरगुती नळांची नोंद मनपा दप्तरी आहे.नळधारकांच्या यादीत हस्तांतरणानंतर मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या बड्या नळधारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे त्यांच्याकडील थकबाकी मनपा घेणार की कंपनी घेणार, याबाबत पालिकेने आजवर कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान होण्याचे संकेत आहेत. शिवाय पालिकेचा करसंकलन विभाग पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा मागील अनेक वर्षांपासून दाखवीत नाही. पुढे अफाट मागे सपाट अशा पद्धतीने आजवर वसुली करण्यात आली आहे. पाणीपट्टीतून मिळाले ५ कोटी१ एप्रिल २०१४ ते २१ आॅगस्ट २०१४ पर्यंत पाणीपट्टीतून ५ कोटी १ लाख २१ हजार रुपये मनपाने वसूल केले आहेत. गतवर्षी पाणीपट्टीतून २२ कोटी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. नळधारकांच्या आकडेवारीचा विचार केला, तर ३१ मार्च २०१४ पर्यंत २ हजार ७५० रुपयांप्रमाणे ३० कोटी २५ लाख रुपये वसुली होणे गरजेचे होते. ८ कोटी रुपये अजून मनपाचे नळधारकांकडे बाकी आहेत. ही रक्कम कोण वसूल करणार असा प्रश्न आहे. यावर्षी ३३ कोटी ५५ लाख रुपयांची पाणीपट्टी घरगुती नळधारकांकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यातील ५ कोटी मनपाने वसूल केले आहेत. उर्वरित २८ कोटींतून ४० टक्के रक्कम कंत्राटदार वसूल करून मनपाला देणार असल्याचे करारात नमूद आहे. असा दावा मनपा करते आहे.