शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज परिसरात पाणीटंचाई

By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत.

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत. नागरिकांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी एकही दमदार पाऊस झालेला नाही. भूगर्भातील पाणीपातळी खोल जात आहे. परिसरातील हातपंप, विहिरी व बोअरवेल्सने तळ गाठला आहे. तर काही विहिरी पूर्ण आटल्याआहेत.काही बोअरवेलचे पाणी कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी पाझरल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी एमआयडीसीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिक पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीचे वापरतात. काही ठिकाणी टँकरचालक राजकीय पुढारी किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ थांबवत असल्यामुळे गरीब नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाऊस न झाल्यामुळे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीची पेयजल योजनाही तलावात पाणी नसल्याने उपयोगाची राहिलेली नाही. कारखान्यांचे पाणीबंद करावेऔद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जाते. कारखान्यांपेक्षा नागरिकांना पाण्याची जास्त गरज आहे. प्रशासनाने दारू, बीअर कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून नागरिकांना ते द्यावे. -प्रकाश जाधव, कामगार नेते पाणी जपून वापरावेपावसाअभावी जलसाठे आटले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. त्यामुळे आहे ते पाणी नागरिकांनाी काटकसरीने वापरावे. -सुनील काळे, उपसरपंच , वडगाव कोल्हाटीपर्यावरणाचे संतुलन गरजेचेपर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी दीर्घायुषी झाडे लावण्याची गरज आहे. आज कोट्यवधी रुपये झाडे लावण्यावर खर्च केले जातात; पण त्यांची जोपासना होणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे पाऊस पडत नाही. दारू, बीअर कंपनीचे पाणी बंद करून ते नागरिकांना पिण्यासाठी द्यावे. -सुरेश फुलारे, लघुउद्योजक