शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

रांजण भरण्यासाठी पाण्याचा शोध

By admin | Updated: March 28, 2016 00:03 IST

पैठण : गोदावरी पात्र कोरडे झाल्याने नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यासाठी भाविक, वारकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे़

पैठण : गोदावरी पात्र कोरडे झाल्याने नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यासाठी भाविक, वारकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे़ गोदावरीच्या पाण्याशिवाय हा रांजण भरत नसल्याने गोदावरी पात्रात शोध घेऊन पाणी रांजणासाठी भाविक नेत असल्याचे दिसून आले़ नाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण तुकाराम बीजपासून भरण्यास प्रारंभ करण्यात आला आहे़ या रांजणात भगवान कृष्ण यांनी १२ वर्षे कावडीने पाणी आणून भरल्याचा इतिहास आहे़ दरम्यान, हा रांजण भरण्यासाठी मी दरवर्षी येईल असे आश्वासन नाथ महाराजांना भगवंताने दिले होते़ यानुसार नाथषष्ठीसाठी भगवंत हा रांजण भरण्यास येतात अशी धारणा भाविकांत आहे़ हा रांजण गोदावरीतून पाणी आणून भरावा लागतो; मात्र यंदा गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडता येत नसल्याने भाविकांना गोदावरीत भटकंती करून पाणी शोधावे लागत आहे, तर गोदावरी पात्रात झरे करून त्यातील नितळ पाणी घ्यावे लागत आहे़ यामुळे यंदा पाणी आणणाऱ्या भाविकांची परीक्षाच भगवंत घेत आहे़