निळवंडेतून सोडलेले पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:08 IST2018-11-18T19:08:34+5:302018-11-18T19:08:49+5:30
औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

निळवंडेतून सोडलेले पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले
औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.
निळवंडे प्रकल्पातून १४ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. निळवंडे प्रकल्पातून सोडलेले पाणी ओझर बंधाऱ्यातून येते. या बंधाºयाच्या कालव्यांतून पाणी वळविण्यात आले. बंधारा भरल्यानंतर ओव्हर फ्लोचे पाणी जायकवाडी प्रकल्पाकडे येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच दिवस उलटूनही जायकवाडी प्रकल्पात अजूनही पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.
ओझर बंधाºयाखील जवळपास १६ बंधारे आहेत. पाणी अडविण्याचा प्रकार थांबल्यामुळे पाण्याचा वेग वाढला आहे. पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पुढे केवळ पाचेगाव आणि मधमेश्वर बंधारे आहे. मधमेश्वरचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हे दोन बंधारे ओलांडून रात्रीतून पाणी जायकवाडीला पाणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निळवंडेतून पाच दिवसांपासून २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. जायकवाडीत रविवारी सकाळी २९.४८ टक्के पाणीसाठा होता. सोमवारी पाणीसाठ्यात किती वाढ होते अथवा किती पाण्याची आवक होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाथसागरापर्यंत फारसे पाणी येण्याची चिन्हे नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.