पाण्यासाठी घागरमोर्चा
By Admin | Updated: July 15, 2014 00:48 IST2014-07-15T00:21:51+5:302014-07-15T00:48:18+5:30
बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागरमोर्चा १४ जुलै रोजी काढला़

पाण्यासाठी घागरमोर्चा
बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागरमोर्चा १४ जुलै रोजी काढला़
कौसडी येथे गेल्या दोन महिन्यांपासून गावाला नियमीत पाणीपुरवठा होत नाही़ त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या़ परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले़
त्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांनी कौसडी येथील हनुमान मंदिरापासून मुख्य रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयावर सोमवारी सकाळी घागरमोर्चा काढला़ यावेळी सरपंच यशवंतराव देशमुख यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले़ यावेळी सदाशिव इखे, शेख निसार, अनंतराव इखे, एकनाथ इखे, शेख रशिद भाई, अशोक सावळे, माणिक इखे, जी़ आऱ पाटील, बळीराम बहिरट, मुंजा बहिरट, शेख अल्ताफ आदींचा सहभाग होता़ यावेळी पोलिस निरीक्षक तरटे, जमादार शेषराव जाधव यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता़ (वार्ताहर)
पाणीपुरवठा सुरळीत करणार
विद्युत बील भरून आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याचे यावेळी सरपंच यशवंतराव देशमुख यांनी सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले़
वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारीचा वीज पुरवठा वीज बिल न भरल्यामुळे तोडला आहे़ ग्रामपंचायत वीज बिल भरण्यास तयार आहे़ परंतु, वीज वितरण कंपनीचे अधिकारी बील देत नसल्यामुळे विलंब लागत आहे, असे सरपंच यशवंतराव देशमुख यांनी सांगितले़
येथील ग्रामस्थांनी नियमित नळपट्टी व घरपट्टी ग्रामपंचायतीमध्ये भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच देशमुख यांनी केले़