शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एकीकडे पाण्याची मारामार; दुसरीकडे योजनांचा भडिमार; जायकवाडी धरणावरच आहे भिस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:30 IST

१२ वर्षांत केवळ ४ वेळाच भरले जायकवाडी धरण, २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन यावरच

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी धरणावरच २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मागील १२ वर्षांचा धरणाचा आढावा घेतला तर फक्त चार वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले, सात वेळा धरण मृतसाठ्यात गेले, तर एका वर्षी ९० टक्क्यांपर्यंत धरणात पाणी होते. जायकवाडीची अशी परिस्थिती समोर असताना नवीन पाणीपुरवठा योजनांचा भडिमार केला जात आहे.

महापालिका व झालर क्षेत्रासाठी जलवाहिन्यांचे नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे वाळूज परिसर, शेंद्रा व डीएमआयसीची भविष्यातील गरज समोर ठेवूनही नियोजन केले जात आहे. या सगळ्या पाणीपुरवठा योजनांसाठी जायकवाडीच केंद्रस्थानी असणार आहे.मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. परळीचे वीजनिर्मिती करणारे औष्णिक वीज केंद्रसुद्धा याच पाण्यावर अवलंबून आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल २०८ कि.मी. आहे. जायकवाडीतून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सुटते. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. ४०० गावांची तहानही जायकवाडीच भागवते. औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, (डीएमआयसी) चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत.

जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील गावांसह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना रोज ५२ ते ६० एमएलडी पाणीउपसा होतो. म्हणजेच औरंगाबादला रोज २ ते ३ द.ल.घ.मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातून पाणीउपसा सुरू केल्यानंतर साधारणत: दीड वर्ष पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द.ल.घ.मी. आहे. २५० दलघमी पाणी मृतसाठ्यातून मिळते. जायकवाडीत सध्या ३२ टक्के पाणीसाठा आहे.

१०.२० टीएमसी पाणी आरक्षितलाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत फेब्रुवारी २०२१ मध्ये सांगितल्यानुसार जायकवाडीत ७.५५ टीएमसी गाळ आहे. सुमारे ९.६७ टीएमसी बाष्पीभवन होते. माजलगाव धरणाला ४.०६, औरंगाबाद पालिकेला १.५५, जालना शहराला ०.२६, २५० गावांना ०.५१ टीएमसी, गेवराई शहराला १.८३, सर्व एमआयडीसी ०.५७ टीएमसी, परळी औष्णिक १.४१ तर आकस्मिक पिण्याच्या आरक्षणासाठी ४.०६ असे १०.२० टीएमसी पाणी आरक्षित आहे.

शहरासाठी अशा योजना, असा उपसाऔरंगाबाद शहर सध्या : १३० ते १४० एमएलडी दररोज उपसाएमआयडीसी : ५६ एमएलडी दररोज उपसाएमआयडीसी, जालना, डीएमआयसी संयुक्त : ७२ एमएलडी (२० एमएलडी डीएमआयसी)

प्रस्तावित योजनानवीन पाणीपुरवठा योजना : ६०५ एमएलडीझालर प्रस्तावित योजना : १२२ एमएलडी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण