शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जमीन विकून पाजले गावाला पाणी

By admin | Updated: September 6, 2015 23:59 IST

बीड : गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे स्वत:ची दोन एकर जमीन विकून विहीर खोदली. एवढेच नाही तर तीन किमी अंतरावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणून कायमस्वरुपी प्रश्न सोडविला.

बीड : गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे स्वत:ची दोन एकर जमीन विकून विहीर खोदली. एवढेच नाही तर तीन किमी अंतरावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणून कायमस्वरुपी प्रश्न सोडविला. अशा प्रकारे दुष्काळात सामाजिक बांधिलकीचा ओलावा जपण्याचे काम काळेगाव हवेली (ता. बीड) येथे राजेंद्र पवार या सामाजिक कार्यकर्त्याने केले आहे. चारा छावण्या, पाणीपुरवठ्याच्या ठेक्यासाठी मारामार करणाऱ्यांच्या डोळ्यात काळेगावच्या पवारांनी झणझणीत अंजन घातले आहे.जलस्वराज्य, स्वजलधारा, भारत निर्माण या एक ना अनेक योजना राबवूनही कित्येक गावे तहानलेलीच आहेत. योजनेसाठी आलेला निधी घशात घालून गावांना वेठीस धरण्याचे प्रकार जागोजागी होत असताना काळेगावात राजेंद्र पवार यांनी पदरमोड करुन गावाला दिलासा दिला. या विहिरीवरील पाण्यावरच सध्या अख्ख्या गावची तहान भागवली जात आहे. ३ हजार लोकसंख्येच्या काळेगावमध्ये पाण्याचे मोठे दुर्भिष्य. डोईवर हंडा व रानोमाळ पायपीट हा इथल्या बायाबापड्यांचा ठरलेला नित्यक्रम! गावाच्या हिताची तळमळ असलेल्या राजेंद्र पवार यांनी पाणीप्रश्न दूर करण्यासाठी पाऊल उचलले. त्यांनी ना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविले ना कोणापुढे हात पसरवले. त्यांचा स्वत:चा विहीर खोदण्याचा व्यवसाय आहे. क्रेन घरचेच असल्याने उरला प्रश्न इतर खर्चाचा. पैसा अपुरा पडू नये यासाठी त्यांनी दोन एकर जमीन विकून त्याचीही तरतूद केली. गावालगतच्या बुडीत क्षेत्रात ‘स्पॉट’ निश्चित करुन खोदकामाचा नारळ फोडला. योगायोगाने पाणीही भरपूर लागले. त्यामुळे पवारांचा उत्साह वाढला. त्यांनी तीन एकरवरुन पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणले.पाण्याच्या टाक्या बसवून वाटपाचे योग्य नियोजन केले. त्यामुळे आवश्यक तेवढ्याच पाण्याचा उपसा होतो. दुष्काळाचा फायदा घेऊन पाण्याचा पैसा करणाऱ्यांच्या गर्दीत राजेंद्र पवार यांनी मात्र माणुसकीचे दर्शन घडविले आहे. याकामी गणेश पवार, संभाजी साबळे यांचे सहकार्य मिळाल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.विहीर, पाईपलाईनसाठी १३ लाख रुपये खर्च आला. गावाला पाणीपुरविण्याचा संकल्प आपण केला होता, शब्दाला जागायचे होते. त्यामुळेच जमीन विकण्याचे धाडस केले. मला राजकारण करायचे नाही, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)