शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:02 IST

टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. बहुतांश तालुक्यांत समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी टँकरने पुरवठा करावा लागणार आहे. 

पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा पुढे पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. जून मध्यापर्यंत ६०० च्या आसपास टँकर सुरू होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात जवळपास १९६ गावे आणि ७२ वाड्यांत पाणीटंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. यात गंगापूर १११, पैठण ४६, सिल्लोड ६२, फु लंब्री २०,  वैजापूर ३ टँकर, असे एकूण २४२ टँकर सुरू आहेत. 

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन व परिसरात पाण्यासाठी भयावह परिस्थिती आहे. ग्रामस्थांना पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी पत्र्यांच्या पन्हाळाखाली ड्रम भरून ठेवावे लागत आहेत. अशातच टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार ३० जूनपर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो, त्यानंतर टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्याकरिता जुलै महिन्याचे काही दिवस टँकर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

शासनाकडे पाठविला प्रस्ताव जिल्ह्यात टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील किती गावांना टँकरची गरज आहे, त्याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत.जून महिन्यापर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो; मात्र यंदाच्या जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्यामुळे जुलै महिन्यातील काही दिवस गरजेप्रमाणे टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद