शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:44 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली.

ठळक मुद्देविभागात सरासरीपेक्षा ११९ मि.मी. पाऊस जास्तसलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी३ लाख हेक्टरच्या आसपास पिकांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हाहाकार उडवून दिला. वार्षिक सरासरीपेक्षा ११९ मि.मी. पाऊस जास्त नोंदविला गेला आहे. ६७९ मि.मी.च्या तुलनेत ७९८ मि.मी. पाऊस विभागात आजवर झाला. ८ सप्टेंबर रोजी १४५ मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली. ३ लाख हेक्टरच्या आसपास पिकांचे नुकसान झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे.

आठ दिवसांत ३१ जणांचा बळी : ५ जणांचा शोधऔरंगाबाद ४, जालना ४, परभणी २, हिंगोली ४, नांदेड ७, बीड ५, लातूर ३, उस्मानाबाद २ अशा ३१ जणांचा बळी आठ दिवसांत पावसाने घेतला आहे. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसात वाहून गेलेल्या ५ जणांचा शोध सुरू आहे. २३ लहान-मोठी जनावरे पावसाने वाहून गेली. २३ ठिकाणी घरे पडली.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. ४४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सुमारे १ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामाच्या नुकसानाची प्राथमिक नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अनेक ठिकाणी पाहणी, पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवसात ८० मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस म्हणून नोंदला गेला. ५८१ मि.मी.च्या तुलनेत ६९६ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. ११९ टक्के हे प्रमाण आहे. कन्नड तालुक्यातील २ लघुतलाव फुटले असून त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

जिल्हानिहाय पावसाचा तडाखा असा :औरंगाबाद जिल्ह्यात ४४, जालन्यात १५, बीड २२, लातूर ६, उस्मानाबाद १, नांदेड ३१, परभणीतील २६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जालन्यात १४१ टक्के, बीड १३३ टक्के, लातूर १०२ टक्के, उस्मानाबाद १०१ टक्के, नांदेड ११८ टक्के, परभणी ११५ टक्के, हिंगोली १०७ टक्के पाऊस झाला आहे. यापुढे होणारा पाऊस हा खरीप पिकांचे नुकसान करणाराच असेल.

मोठ्या प्रकल्पांची स्थिती अशी :जायकवाडी ४७.९१ टक्के,निम्न दुधना ९६.७० टक्के,येलदरी १०० टक्के,सिध्देश्वर ९९.४२ टक्के,माजलगांव ९४.८७ टक्के,मांजरा ६३.१० टक्के,पैनगंगा ९२.८६ टक्के,मानार १०० टक्के,निम्न तेरणा ७०.१७ टक्के,विष्णुपुरीत १०० टक्के,सिना कोळेगांव ०.४६ टक्के

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यू