शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीजजोडणीचे अर्ज धुळखात

By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST

राजेश खराडे , बीड महावितरण वाढत्या थकबाकीचा गाजावाजा करीत जिल्ह्यात भारनियमन करीत आहे. दुसरीकडे नव्याने विजकनेक्शनसाठी ग्राहकांनी उपविभागाकडे

राजेश खराडे , बीडमहावितरण वाढत्या थकबाकीचा गाजावाजा करीत जिल्ह्यात भारनियमन करीत आहे. दुसरीकडे नव्याने विजकनेक्शनसाठी ग्राहकांनी उपविभागाकडे अर्जासह पैसे भरून देखील कनेक्शन मिळत नाही. अद्यापपर्यंत ६४०४ अर्ज प्रलंबीत असून यापोटी १ कोटी रुपये महावितरणकडे जमा आहेत. नव्याने विजकनेक्शन करिता ग्राहकांना महावितरणकडे अर्ज दाखल करावे लागतात. त्यानुसार महिन्याच्या कालावधीतच अर्जदारांना विजकनेक्शन मिळने अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या वर्गवारीनुसार विजजोडणीच्या कामांचे विभाजण गुत्तेदारांकडे करण्यात आले आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठादेखील महावितरणकडून करण्यात आला आहे. असे असतानाही जिल्ह्यात ६४०४ अर्ज विजकनेक्शनविना उपविभागीय कार्यालयात धूळखात पडून आहेत. यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या ही अधिक आहे. घरगुती ग्राहकांना कनेक्शन देणे सहज शक्य असतानाही गुत्तेदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नव्याने घेण्यात येणाऱ्या कनेक्शसाठी कार्यालयीन खर्च केवळ १६०० रुपये असतानही अधिकची रक्कमेची मागणी केली जात आहे. यापूर्वी सर्व्हिस वायर व इतर साहित्याची महावितरणकडून पुर्तता केली जात होती. नियमावलीत बदल झाल्याने महावितरणकडून रकमेच्या बदल्यात मीटर देऊन इतर साहित्याचा खर्च ग्राहकांच्या पदरी पडत आहे. मीटर बसिवण्याकरिता निविदाच्या माध्यमातून गुत्तेदारांना २ कोटींचीे कामे देण्यात आली आहेत. गुत्तेदारांनी विजजोडणी न केल्यामुळे बदली मीटरच महावितरण कंपनीने ग्राहकांना दिले आहेत. त्यामुळे तात्पुरता प्रश्न मिटला असला तरी दिवसेंदिवस मीटर संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. महावितरणकडेही गुत्तेदारांचे पैसे रखडल्याने अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता गुत्तेदार कामास टाळाटाळ करीत आहेत. गुत्तेदार आणि महावितरण यांच्या वादामुळे मात्र ग्राहकांना पैसे भरूदेखील महावितरणची सेवा मिळत नाही. केवळ घरगुतीच नाही तर व्यापारी, औद्योगितक ग्राहकांचीही विजजोडणी रखडलेली आहे. गुत्तेदार नावालाचविजजोडणीची गुत्तेदारी नावालाच असून सर्व कामकाज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. ग्राहकांच्या तक्रारी महावितरण कार्यालयाकडेच दाखल होत आहेत. याबाबत अधिकारीही अनुत्तरीत असल्याने ग्राहकांचे प्रश्न कायम आहेत.