छत्रपती संभाजीनगरातील SC-ST प्रभाग आरक्षण; इच्छुकांचे आडाखे तयार करून कामास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:33 IST2025-10-31T18:31:51+5:302025-10-31T18:33:13+5:30
लोकसंख्येच्या निकषानुसार राजकीय मंडळींकडून आकडेमोड करणे सुरू

छत्रपती संभाजीनगरातील SC-ST प्रभाग आरक्षण; इच्छुकांचे आडाखे तयार करून कामास प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांची उत्सुकता वाढत आहे. आरक्षण निश्चित होत नाही, तोपर्यंत इच्छुकांना प्रभागही ठरविणे कठीण झाले आहे. आरक्षणाची सोडत निघण्यापूर्वीच राजकीय मंडळींनी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार संभाव्य आरक्षण कसे राहू शकते, यावर आकडेमोड सुरू केली. उतरत्या क्रमानुसार आणि प्रभागातील एस.सी. प्रवर्गातील लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून आरक्षण कोणत्या प्रभागात पडेल, हे ठरविले जात आहे.
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार शहरात २९ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. जनगणनेनुसार मनपा हद्दीतील लोकसंख्या १२ लाख २८ हजार ३२ आहे. ही लोकसंख्या २९ प्रभागांमध्ये विभागण्यात आली. ३४ हजार ते ४६ हजारांदरम्यान प्रभागांची लोकसंख्या निश्चित करण्यात आली. एससी आणि एसटी प्रवर्गाची प्रभागनिहाय लोकसंख्या देखील निश्चित केली आहे. एससी प्रवर्गाची लोकसंख्या २ लाख ३८ हजार १०५ आणि एसटी प्रवर्गाची लोकसंख्या १६ हजार ३२० असल्याचे नमूद आहे. २९ प्रभागांमध्ये ११५ नगरसेवक निवडण्यासाठी २२ उमेदवार एससी प्रवर्गासाठी, तर दोन उमेदवार एसटी प्रवर्गासाठी राखीव असतील. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार मागील आरक्षण गृहीत धरले जणार नाही. ही पहिली निवडणूक गृहीत धरून आरक्षण टाकले जाईल.
प्रभाग क्रमांक - एससी लोकसंख्या - टक्केवारी
२४             - १९३८३----------४२.४२
९ - १६७०२------------४२.०९ 
२८             - १७७५७---------- ३८.२५ 
२९- ७३५२-------------३४.५२
४             - १४३९०-------------३१.८७
३             - १३५५४-------------३१.४७
८             - १२७२३-------------३०७२ 
१८             - १०६९०------------२७.५८
०१ - ९५३४-------------२३.२०
२० -९२६६--------------२०.९६ 
२६             - ८५५६--------------२०.६७ 
२५             - ७९६२--------------१९.९८ 
०५ - ८६३६---------------१९.११
१९ - ७४५०---------------१९.०५
१७ - ६५१०---------------१७.०९ 
०७ - ६५१५---------------१६.७२
२७ - ७२९९----------------१५.७४ 
०२- ६२४९----------------१५.६४
२२ - ७१९९---------------१५.३४
१५- ६००३----------------१४.३६ 
२१- ५९०३----------------१४.२४
२३-६४३७----------------१३.८८
प्रभाग क्रमांक -एसटी लोकसंख्या
१                         - १२९५
४                         - १०५५
५                         - १०३८
२६             - ९०१ 
८                         - ८१९ 
१८             - ७२४