शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

विराट जनआक्रोश मोर्चाने केली माजी खासदाराच्या अटकेची मागणी; शहरात घोंगावले निळे वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:27 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचार विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहरात घोंगावले निळे वादळ

छत्रपती संभाजीनगर : ‘अटक करा, अटक करा, जातीयवादी जलिलांना अटक करा, जो हमसे टकरायेगा, मिट्टी में मिल जायेगा,’ अशा गगनभेदी घोषणांनी सोमवारी शहर दुमदुमले. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ११ जून रोजी पत्रकार परिषदेत अपशब्दाचा वापर करून बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर क्रांती चौक, बेगमपुरा, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत; परंतु जलील यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी विराट असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रिपाइं (आठवले)चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दुपारी मोर्चास प्रारंभ झाला. सिल्लेखाना, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा आणि मिलकॉर्नर मार्गे मोर्चाचा समारोप भडकल गेट येथील जाहीर सभेने झाला.

या मोर्चात पुरुष व तरुणांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी लक्षणीय होती. हाती निळे ध्वज घेऊन मुलाबाळांसह महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्या आक्रमकपणे घोषणाही देत होत्या. त्यामुळे मोर्चा मार्गावर दुतर्फा बघ्यांची गर्दी होती. या मोर्चाच्या अग्रभागी असलेले नेते मंडळी पैठणगेटला तर शेवटचे टोक क्रांती चौकातच होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोर्चेकरी चालत असल्यामुळे पोलिसांनी हे रस्ते वाहतुकीस पूर्णपणे बंद केले होते.

जलील फक्त मागासवर्गीयांच्या विरोधीभडकलगेट येथे सभेत बोलताना प्रमुख नेत्यांनी जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले. जलील मागासवर्गीयांच्या योजना बंद करायला निघाले आहेत. रमाई घरकुल योजना यांना बंद करायची आहे. यांना मोठ्या लोकांचा भ्रष्टाचार दिसत नाही. हा मोर्चा मुस्लिम विरोधी नसून पैसेवाल्यांशी मॅनेज होणाऱ्या सुपारीबाज नेत्याविरुद्ध असल्याचा सूर बाबुराव कदम, अरुण बोर्डे, जालिंदर शेंडगे, संजय ठोकळ, ॲड. विजय जोंधळे, अमित भुईगड, विनोद बनकर, दीपक निकाळजे, सतीश पट्टेकर, मिलिंद शेळके, बाळासाहेब सानप यांच्या भाषणातून उमटला.

हा शक्ती कपूर पण समजतो शाहरुख खानअफसर खान यावेळी म्हणाले की, हा आहे शक्ती कपूर पण स्वत:ला समजतो शाहरुख खान. यांची आतापर्यंतची सर्व आंदोलने सेटलमेंटची आहेत. जेवढी आंदोलने हाती घेतली सर्व धंदे आता अधिक वाढले आहेत. दलित व मुस्लिमांची मते घेऊन संसदेत गेलेल्या जलिलांनी निधी कोठे वापरला त्याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विजय मगरे, बाबा तायडे, सचिन बोर्डे, सुनील सोनवणे, किशोर थोरात, आनंद लोखंडे, अरविंद अवसरमोल, रवी तायडे, माजी सरपंच अंजन साळवे आदींसह शहरातील विविध क्षेत्रांतून आलेल्या नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लक्झरी बस अन् ट्रकही...शहरातील विविध वसाहतीमधून महिला मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाल्या. यावेळेस महिला थेट अनेक लक्झरी बसने क्रांती चौकात आल्या. काही महिला ट्रकने तर काही ट्रॅक्सनी पोहचल्या. त्यांना बाटलीबंद पिण्याचे पाणी देण्यात आले.

शेकडो पोस्टर्स व झेंडेछत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेकडो पोस्टर्स व निळे आणि पिवळे झेंडे या महिलांच्या हाती होते. शिवाय जलील यांच्या विरोधातील पोस्टर्सची संख्याही लक्षणीय होती.

मोर्चातही डीजे वाहनमोर्चात अग्रभागी डीजेचे वाहन होते. त्या वाहनावर उभे राहून अरुण बोर्डे घोषणाबाजी करत होते. मोर्चात पहिल्यांदाच डीजे वापरल्याची चर्चाही रंगत होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरImtiaz Jalilइम्तियाज जलीलagitationआंदोलन