गर्जेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवणारा खिरोळकर स्वत:च सस्पेंड; पण गर्जेवर मात्र सरकार मेहरबान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 20:10 IST2025-06-11T20:09:51+5:302025-06-11T20:10:19+5:30

विनोद खिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले.

Vinod Khirolkar, who sent the proposal to suspend Talasildar Nitin Garje, was himself suspended; but the government is kind to Garje | गर्जेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवणारा खिरोळकर स्वत:च सस्पेंड; पण गर्जेवर मात्र सरकार मेहरबान

गर्जेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवणारा खिरोळकर स्वत:च सस्पेंड; पण गर्जेवर मात्र सरकार मेहरबान

छत्रपती संभाजीनगर : अपर तहसीलदार नितीन गर्जे एका लाचेच्या प्रकरणात गुंतल्याचे १५ मे रोजी समोर आले. २७ दिवसांपासून त्याच्यावर कुठलीही कारवाई शासन स्तरावरून झाली नाही. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव निलंबित उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरने पाठविला होता. मात्र, खिरोळकर स्वत:च २७ मे रोजी लाचेच्या प्रकरणात अडकला, निलंबितही झाला. मात्र, गर्जेवर कारवाई होत नसल्याने सरकार त्याच्यावर मेहरबान असल्याचे बोलले जात आहे.

खिरोळकरने वर्ग २ मध्ये वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याचे किती प्रस्ताव मंजूर केले, त्याची चौकशी सुरू झाली आहे. त्या समितीमध्ये आणखी दोन कर्मचारी वाढवून दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीकडून चौकशी सुरू आहे. पंधरा दिवसांत ही चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे. खिरोळकरच्या काळात ८८ प्रकरणांना मंजुरी दिली गेल्याचे बोलले जात असले, तरी मुळात ही संख्या कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी सूचिता शिंदे, लेखाधिकारी विनोद शास्त्री, तहसीलदार रूपा चित्रकसह एक महसूल सहायक चौकशी समितीत असून त्यात दोन कर्मचारी आणखी वाढविले आहेत.

१३ महिन्यांत वाढविले नेटवर्क
खिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले. खिरोळकरचा पंटर ‘के. एम.’ ला हाताशी धरून त्याने मोठे नेटवर्क उभारले. प्रशासकीय निर्णयात बाहेरच्या खासगी व्यक्तींना ढवळाढवळ करण्याची संधी दिली. याकडे प्रशासनातील सर्व यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे हा सगळा प्रकार घडला. तिसगाव येथील वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी खिरोळकर आणि महसूल सहायक त्रिभुवन यास २७ मे रोजी अटक झाली होती.

Web Title: Vinod Khirolkar, who sent the proposal to suspend Talasildar Nitin Garje, was himself suspended; but the government is kind to Garje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.