वैजापुरात ८ संशयित चोरांना गावकऱ्यांची मारहाण, दोघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:34 IST2018-06-08T16:28:24+5:302018-06-08T16:34:33+5:30

तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी आज पहाटे ८  संशयित चोरांची टोळी पकडली.

Villagers kill 8 suspected thieves in Vaijapur, killing two | वैजापुरात ८ संशयित चोरांना गावकऱ्यांची मारहाण, दोघांचा मृत्यू 

वैजापुरात ८ संशयित चोरांना गावकऱ्यांची मारहाण, दोघांचा मृत्यू 

वैजापुर (औरंगाबाद ) : तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी आज पहाटे ८  संशयित चोरांची टोळी पकडली. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. यातील दोघाजणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  

तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जवळपास ५० ते ६० गावातील नागरिक रात्रभर गावात खडा पहार देतात. आज पहाटे पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी ८ संशयित चोरट्यांना पकडले. यावेळी संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यांना बेदम चोप दिला. यातील गंभीर प्रकृती असलेल्या चार जणांना वैजापूर पोलिसांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्ण्यालयात हलवले. येथे उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. भारत सोनवणे (२८,मिटमिटा,औरंगाबाद ) व शिवाजी शिंदे (४५ , मुकुंदवाडी, औरंगाबाद ) असे मृतांचे नावे आहेत. इतर चार जणांवर वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

Web Title: Villagers kill 8 suspected thieves in Vaijapur, killing two