शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपी विक्रमसिंह चौहान यांचा राजीनामा

By admin | Updated: February 9, 2016 00:27 IST

लातूर : बहुचर्चित कल्पना गिरी बलात्कार व खून प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.

लातूर : बहुचर्चित कल्पना गिरी बलात्कार व खून प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्या व शहर काँग्रेस विधानसभा मतदारसंघाच्या सचिव कल्पना गिरी (३०) यांचा बलात्कार करुन खून करण्यात आला. शेवटी कल्पना गिरी यांचा तुळजापूरनजीक पाचुंदा तलावात २३ मार्च २०१४ रोजी मृतदेह आढळून आला. या प्रकरणी महेंद्र चौहान, नुरमियाँ किल्लारीकर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पुढे तपासात विक्रमसिंह चौहान आणि कुलदिपसिंग ठाकूर यांनाही अटक केली. तेंव्हापासून विक्रमसिंह चौहान हे तुरुंगात आहेत. त्यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अलिकडे याच खटल्यातील अटकेत असलेल्या कुलदिपसिंग ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. विक्रमसिंह चौहान यांनी बलात्कार व खून प्रकरणात आपला कुठलाही सहभाग नाही, त्यामुळे आपल्याला न्यायालयाने जामीन द्यावा, अशी याचिका आपल्या वकिलामार्फत न्यायालयात दाखल केली होती. जिल्हा न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठात या याचिकेवर सुनावणी होऊन त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, चौहान यांनी काँग्रेस उपाध्यक्षपदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. (प्रतिनिधी)युवक काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना मंगल गिरी यांच्या बलात्कार व खून प्रकरणात जवळपास २१ महिन्यांपासून अटकेत असलेले तत्कालीन नगराध्यक्ष तथा महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांना न्यायालयाने अद्याप जामीन मंजूर केला नाही. परिणामी त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा आणि जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांचा उपाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर केला असून, नगरसेवकपदाचा राजीनामा मात्र मनपा आयुक्तांकडे पाठविला आहे. यावर मनापा आयुक्त निर्णय घेतील. गेल्या पावणेदोन वर्षापासून कल्पना गिरी खून खटल्यात विक्रमसिंह चौहान हे तुरुंगात आहेत.