शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

व्हीडीओग्राफी पथकाने सभांचे चित्रीकरण काळजीपूर्वक करावे

By admin | Updated: October 6, 2014 00:11 IST

हिंगोली : व्हीडीओग्राफरने सर्व बाबींचे चित्रीकरण अत्यंत काळजीपूर्वक करण्याची सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) दर्शन गौडा यांनी केली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या व्हीडीओ सर्व्हिलिअन्स टीममधील व्हीडीओग्राफरने उमेदवारांच्या सभा व रॅलीमधील खर्चाशी संबंधित सर्व बाबींचे चित्रीकरण अत्यंत काळजीपूर्वक करण्याची सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) दर्शन गौडा यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सायंकाळी सहाय्यक निवडणूक निरीक्षक व खर्च नियंत्रणाशी संबंधित सर्व पथक प्रमुखांच्या बैठकीत गौडा मार्गदर्शन करीत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र परळीकर, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सुरेश केंद्रे, समन्वयक अतुल गावडे, संपर्क अधिकारी विशाल जाधवर, एमसीएमसीचे सचिव सुनील सोनटक्के, सहाय्यक निवडणूक निरीक्षक किरण कोल्हे (हिंगोली), मनोज गग्गड (वसमत), राठोड (कळमनुरी) आदी उपस्थित होते. निरीक्षक गौडा म्हणाले की, खर्च नियंत्रण समिती अंतर्गत असलेल्या व्हीव्हीटी, व्हीएसटी, एसएसटी पथकांकडून संबंधित विधानसभांचे सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी काळजीपूर्वक काम करून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही उमेदवारांच्या राजकीय सभा, रॅलीमधील निवडणूक खर्चाशी संबंधित कोणतीही बाब कॅमेऱ्यामधून सुटता कामा नये, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी त्यांच्याकडे असलेल्या पथकांमधील सर्व व्हिडीओग्राफरला चित्रीकरणाबाबत योग्य ती माहिती देऊन त्यांच्याकडून काटेकोरपणे चित्रीकरण करून सदरचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी, असेही गौडा यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत खर्च नियंत्रण समितीची अत्यंत महत्वाची भूमिका असल्याने प्रत्येक सदस्याससने जबाबदारीने काम करण्याची सूचना गौडा यांनी केली. तसेच सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी अधिक तत्परतेने काम करावे, असे सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी परळीकर यांनीही वसमत, कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी व्हीएसटी व व्हीव्हीटी पथकामधील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना केली. (जिल्हा प्रतिनिधी)