पाण्याच्या टँकरने घेतला युवकाचा बळी

By Admin | Updated: April 18, 2016 00:57 IST2016-04-18T00:30:42+5:302016-04-18T00:57:28+5:30

कोळगाव : पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय टँकरने दुचाकीस्वारास चिरडले. यात तो ठार झाला. त्याची आई जखमी आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता कोळगावनजीक घडली.

A victim of water tanker took the victim | पाण्याच्या टँकरने घेतला युवकाचा बळी

पाण्याच्या टँकरने घेतला युवकाचा बळी


कोळगाव : पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय टँकरने दुचाकीस्वारास चिरडले. यात तो ठार झाला. त्याची आई जखमी आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता कोळगावनजीक घडली.
अक्षय शिवनाथ सिरसट (वय १९, रा. तांदळा, ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. आई मंदा शिवनाथ सिरसट हिच्यासमवेत तो दुचाकी (एमएच २३ एएच ४७६९) वरून मादळमोहीला कपडे खरेदीसाठी चालला होता. मादळमोही येथे पाणीपुरवठा करणारे टँकर (एमएच २३ / ४९७३) पाणी भरण्यासाठी तांदळाकडे निघाले होते. टँकरने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यात दोघेही मायलेक जखमी झाले. जिल्हा रूग्णालयात नेताना वाटेत अक्षयचा मृत्यू झाला. टँकरचालक फरार आहे.
दुसऱ्या एका अपघातात दुचाकीच्या धडकेत तांदळा येथे उत्तम बाबूराव पाटील या वृध्दाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. (वार्ताहर)

Web Title: A victim of water tanker took the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.