शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावतीत डेंग्यूसदृश्य तापाने घेतला बालकाचा बळी

By admin | Updated: August 31, 2014 01:08 IST

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात गेल्या आठ दिवसांपासून डेंग््यू सदृश्य तापाची लागण झाल्याने निवृत्ती भालचंद्र गावंडे (५) या बालकाचा तापाने बळी गेला.

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात गेल्या आठ दिवसांपासून डेंग््यू सदृश्य तापाची लागण झाल्याने निवृत्ती भालचंद्र गावंडे (५) या बालकाचा तापाने बळी गेला. गाव परिसरात काही दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने गावात तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. गावातील अश्विनी गावंडे या बालिकेस औरंगाबाद येथे भरती करण्यात आले.कमलाबाई गावंडे, राणाबाई सपकाळ, अंकुश साळवे, मुकेश साळवे यांनाही तापाची लागण झाल्याने बुलडाणा व वालसावंगी येथील केंद्रातून उपचार सुरु आहेत. जालना येथून आरोग्य पथक गावात दाखल झाले होते. रुग्णंची भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी गावातील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात औषधी टाकली. ग्रामपंचायतनेही ताबडतोब धूर फवारणी केली. घरोघरी गोळ्यांचे वाटप केले. गावातील उघड्या नळ जोडण्यांची दुरुस्ती केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून गावात तळ ठोकून आहेत. ग्रामस्थांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या काळजी घेण्याचे अवाहन केले. गावात कोरडा दिवस पाळण्यात आला. काही घरांना भेटी देऊन कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले.गावात महिनाभरातून तीनदा रोहित्र जळाल्याने गाव अंधारात आहे. वीज नसल्याने ग्रामस्थांना डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांमुळेही साथीचे आजार पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणेआहे. ग्रामसेवक इंगळे म्हणले, गावात ताप आहे. पंरतु ती काही दूषित पाण्यामुळे नाही. कारण आम्ही ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. पाण्याचे नमुनेही चांगले आहेत. धूर फवारणी करण्यात आली. गावात स्वछता ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडूनही गावातील रुग्णांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)