---
मावसाळा, घटांब्री, वारेगाव,
उमरावती तीर्थक्षेत्रांना क दर्जा
---
औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील संत तुकाराम मंदिर, सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील यक्षणीमाता मंदिर, फुलंब्री तालुक्यातील विरगाव येथील बालाजी मंदिर, उमरावती येथील साकरादेवी मंदिर या तीर्थश्रेत्रांना क दर्जात समाविष्ट करण्याच्या ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
--
रस्ते विकास योजनेसाठी समिती गठित
---
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते विकास योजना २०२१-२०४१ तयार करण्यासाठी समिती गठित केली आहे. त्यात रस्त्यांची जिल्हा सूची, तालुका व जिल्हा नकाशे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये अवर्गीकृत रस्ते वर्गीकृत करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.