दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स कुटूंबासह वेरुळच्या पर्यटनाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 19:02 IST2017-12-22T19:00:31+5:302017-12-22T19:02:26+5:30
आज सकाळी भव्यतेने नटलेली डेक्कन ओडिसी (इंडियन ओडिसी) रेल्वे शहरात दाखल झाली. या रेल्वेतील ३५ विदेशी पर्यटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स आणि त्याच्या कुटुंबाचा समावेश होता.

दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स कुटूंबासह वेरुळच्या पर्यटनाला
औरंगाबाद : आज सकाळी भव्यतेने नटलेली डेक्कन ओडिसी (इंडियन ओडिसी) रेल्वे शहरात दाखल झाली. या रेल्वेतील ३५ विदेशी पर्यटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स आणि त्याच्या कुटुंबाचा समावेश होता.
या राजेशाही रेल्वेने आलेल्या ३५ परदेशी पर्यटकांचे स्थानकावर आगमन होताच यात दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स असल्याचे काहींच्या लक्षात आले. यानंतर रोड्सच्या चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी त्याच्या भोवती गराडा केला.
वेरूळ लेणी पर्यटनासाठी डेक्कन ओडिसी स्थानकावर येताच दिलीप खंडेराय आणि त्यांच्या कला पथकाने सर्व पाहुण्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी टुरिझम प्रमोटर्स गील्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग यांची उपस्थिती होती. यानंतर दुपारी १ च्या दरम्यान सर्व पर्यटक वेरुळच्या दिशेने रवाना झाली.