शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

तोंडोळी अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी घेतली पीडितांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 12:14 PM

Rupali Chakankar News : मन्न सुन्न करणाऱ्या तोंडोळी येथील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दरोडेखोरांचा म्होरक्या आणि इतर एकाला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे१९ ऑक्टोबरच्या रात्री या टोळीने तोंडोळी येथे मध्यप्रदेशातून कामासाठी आलेल्या कुटुंबातील दोन महिलांवर सामूहिक अत्याचार करीत लुटमार केलीदरोडा आणि अत्याचाराने पिडीत कुटुंबाना मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन

औरंगाबाद : तोंडोळी येथील दरोडा आणि महिलांवरील सामुहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. राज्यभरातून आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar) यांनी तोंडोळी येथील पीडितांची भेट आज सकाळी भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्याचाराचा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती दिली.  

मन्न सुन्न करणाऱ्या तोंडोळी येथील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दरोडेखोरांचा म्होरक्या आणि इतर एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी सहा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तोंडोळी पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी चाकणकर यांनी अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात येणार अशी माहिती दिली. तसेच दरोडा आणि अत्याचाराने पिडीत कुटुंबाना मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल असे आश्वासन दिले.  कसे घडले तोंडोळी अत्याचार प्रकरण १९ ऑक्टोबरच्या रात्री या टोळीने तोंडोळी येथे मध्यप्रदेशातून कामासाठी आलेल्या कुटुंबातील दोन महिलांवर सामूहिक अत्याचार करीत लुटमार केली होती. त्यापूर्वी प्रभूची टोळी बिडकीन परिसरात दोन दुचाकीवरून एका ठिकाणी जमा झाली. सुरुवातीला टोळीने गिधाडा शिवारात एका शेतावर लुटमार केली. तेथून लोहगावकडे जाताना एका वस्तीवर लुटमार करीत हजार रुपये आणि दुचाकी पळवली. तेथून तीन चार ठिकाणी चोरी करीत तोंडोळी येथील शेतवस्तीवर टोळी पोहोचली. तेथे लुटमार आणि महिलांवर अत्याचार केल्यानंतर दुचाकीवरून पोबारा केल्याची कबुलीही मुख्य आरोपीने दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी सहा जणांचा पोलीस शोध सुरु आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस