शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजीमंडईत सुटली दुर्गंधी

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

हिंगोली : नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या भाजीपाला बाजारात घाण आहे की घाणीत बाजार भरतो, हे कळायला मार्ग नाही.

हिंगोली : नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या भाजीपाला बाजारात घाण आहे की घाणीत बाजार भरतो, हे कळायला मार्ग नाही. कित्येक वर्षांपासून बाजार आहे, त्या ठिकाणी आहे. सुविधा वाढण्याऐवजी समस्याच वाढत गेल्या. तरीही हा बाजार नित्यनेमाने भरतो. दुर्गंधी, चिखल, वराह, जनावरांचा वावर असे चित्र कायम असते. याची तमा ना शहरवासियांना ना पालिकेला. हिंगोली बाजार समितीला जागा अपुरी पडत असल्यामुळे भाजीपाला बाजाराचे नियंत्रन पालिकेकडे सोपवले. साफसफाईपासून दुरूस्तीपर्यंतचे काम पालिकेला करावे लागते. पालिकेकडून उभारणीचे काम तर सोडाच नियमित साफाईसही कर्मचाऱ्यांची अनास्था दिसते. सत्ता बदलली, लोक बदलले, अधिकारी बदलले पण फरक पडला नाही. उन्हाळा आणि हिवाळ्यात घाणीची तीव्रत्ता दिसून येत नाही. पण जसा पावसाळा सुरू झाला तसा घाणीने कळस गाठला. पहिल्याच पावसात चित्र पालटले. आता बाजारात पायही ठेवायला जागा नाही. पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने रस्त्यावर डोह साचले. नियमित कचरा उचलला जात नसल्याने पाण्यामुळे चिखल तयार झाला. कचऱ्याचे ढीग उचलल्या जात नसल्यामुळे दुर्गंध निर्माण झाली. उग्र वासाच्या दुर्गंधीमुळे नाक दाबून भाजीपाला खरेदी करावा लागतो.कचराकुंड्या गायबस्वच्छ शहर सुंदर शहरासाठी पालिकेने जागोजाग कचरा कुंड्या ठेवल्या होत्या. अल्पावधीतच कुंड्या गायब झाल्याने बाजारात रस्त्यावर कचरा टाकण्यावाचून पर्याय नाही. नव्याने कुंड्या ठेवण्याची तसदीही घेतली नाही. स्वच्छतागृहाची बिकट अवस्थाएकमेव स्वच्छतागृहाची अवस्था पाहण्यासारखी नाही. अर्धा बाजार या स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीनेच आजारी आहे. बांधकामानंतर कधी कोणी त्याकडे ढुंकूनही पाहिले नसावे, हे पाहताक्षणीच जाणवते.पालिकेकडे अपुरा कर्मचारीवर्ग आहे. मात्र स्वच्छतेकडे लक्ष दिले जाईल, असे नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ म्हणाल्या. (वार्ताहर)