चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने वैजापुरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 19:09 IST2019-05-27T19:07:23+5:302019-05-27T19:09:42+5:30
शनिवारपासून मुले बेपत्ता आहेत

चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने वैजापुरात खळबळ
शिऊर (औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यातील भादली येथील चार अल्पवयीन मुले शनिवारी सकाळपासून बेपत्ता आहेत. सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाळू संतोष मोरे (१२), समाधान भानुदास सोनवणे(११), विक्रम भानुदास सोनवणे (१०), विलास सखाराम सोनवणे(१५) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत.
या घटनेची मिळालेली माहिती अशी की, बाळू संतोष मोरे, समाधान भानुदास सोनवणे, विक्रम भानुदास सोनवणे, विलास सखाराम सोनवणे हे चारजण शनिवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही अशी माहिती संतोष मोरे यांनी दिली. बाळू हा संतोष मोरे यांच्या मुलगा असून समाधान व विक्रम हे दोघेही संतोष यांच्या साडूचे मुले आहेत. तर विलास मोरे यांचे शेजारी सखाराम सोनवणे यांचा मुलगा आहे. या बाबत संतोष मोरे व सखाराम सोनवणे यांनी शिऊर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गात करीत आहेत