शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरी प्रकल्पात ११ दलघमी पाणी

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याची आवक होत नसल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़

नांदेड : अर्धापावसाळा संपला तरी विष्णूपुरी प्रकल्पात अद्याप वरील भागातून पाण्याची आवक होत नसल्यामुळे पुढील काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़ प्रकल्पात सध्या ११ दलघमी पाणीसाठा असून हे पाणी अवघे तीन महिने पुरेल एवढेच आहे़ मराठवाड्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे़ पाच नक्षत्र संपले असून सहावे आश्लेषा नक्षत्र सुरू आहे़ या सर्व नक्षत्रात समाधानकारक पाऊस न बरसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पावसाअभावी मराठवाड्यातील प्रमुख धरणांची स्थिती चिंताजनक आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात सध्या ११़४६ दलघमी साठा उपलब्ध असून हे पाणी नांदेडकरांना पुढील अडीच, तीन महिने पुरेल एवढेच आहे़ येणाऱ्या नक्षत्रात पावसाने साथ न दिल्यास दिवाळीपासून पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार आहे़ येणाऱ्या मघा, पूर्वा, हस्त या तीन नक्षत्रावरच आता मदार आहे़ १६ आॅगस्टपासून मघा या नक्षत्राला प्रारंभ होणार आहे़ मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा आहे़ मात्र या नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यास येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन पावसाळ्यात तीन दिवसाआड पाणी सोडावे लागत आहे़ शहराला दोन दिवसाआड २५ क्युसेस पाणी सोडले जाते़ त्यामुळे पाण्याचा वापर नागरिकांना जपून करावा लागणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने मागील महिन्यात दिग्रस बंधाऱ्यातून १० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा वाढला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत साधारणपणे १२० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव कोरडेच दिसत आहेत़ येणाऱ्या काळातील पाण्याचे संकट ओळखून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे़ महापालिकेला शहरात अनावश्यक पाणी वापरावर निर्बंध घालून पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील साठा राखीव ठेवावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)