शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणात वैशाख वणवा

By admin | Updated: August 23, 2015 00:03 IST

सोमनाथ खताळ , बीड पावसाने अखडता हात घेतल्यामुळे यावर्षीच्या श्रावण महिन्यावर दुष्काळाची छाया स्पष्ट दिसू लागली आहे. बीड तालुक्यातील कपीलधार,

सोमनाथ खताळ , बीडपावसाने अखडता हात घेतल्यामुळे यावर्षीच्या श्रावण महिन्यावर दुष्काळाची छाया स्पष्ट दिसू लागली आहे. बीड तालुक्यातील कपीलधार, पाटोद्याजवळील सौताडा याठिकाणीच धबधबे कोरडेठाक पडली आहेत. तर इतर शिवालये व विविध देवस्थाने तहानलेली आहेत. यामुळे पवित्र स्रान करण्याची संधी मिळणार नसल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे.बीडमधील कंकालेश्वर, कपिलधार येथील मन्मथस्वामींचे मंदिर, पाटोदा तालुक्यातील सौताडा, गोरक्षनाथ टेकडी, परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आदी ठिकाणी नुसते देवस्थानच नाही तर प्रेक्षणीय स्थळे आहेत. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने ना धबधब्यांना पाणी आले ना प्रेक्षणीय स्थळांमध्ये हिरवळ दिसते. त्यामुळे देवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत आहे.‘वैद्यनाथा’ शेजारील तिर्थ कोरडेठाकबारा ज्योतीर्लींगापैकी एक असणारे परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात भाविकांची थोडी गर्दी वाढते. येथे दर्शनासाठी जाण्यापूर्वी मंदिराच्या उजव्या बाजुला असणाऱ्या तिर्थात भाविक अंघोळ करायचे. परंतु येथे असणाऱ्या हरीहर, मार्तंडे आणि अमृतेश्वर या तीन तिर्थापैकी हरीहर व मार्तंडे हे दोन्ही तिर्थ कोरडेठाक पडले आहेत तर अमृतेश्वर मध्ये ओंजळभर पाणी आहे. याच पाण्यात हातपाय धुवून भाविक दर्शनाला जातात. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाजुला असणाऱ्या मेरू पर्वतावर भाविक जात असत. येथून संपूर्ण शहराचे दर्शन घडते. परंतु पावसाअभावी येथील हिरवळ गायब झाली असून पर्यटकांसह भाविकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसते.सौताड्यात गार्डन आहे पण पाणी नाहीसौताडा येथील धबधब्याचाही आनंद यावर्षी घेता आला नाही. या धबधब्यात पाणीच वाहिले नाही. तिसऱ्या सोमवारी रामेश्वर मंदिरात मोठी यात्रा भरते. सुमारे पाच लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. महिनाभर ही यात्रा चालते. परंतु धबधब्यात पाणीच नसल्याने भाविकांसह पर्यटकांमध्ये उत्साह नाही.दीपमाळमधील सुशोभिकरण वाळलेबीड शहरातील खंडोबा मंदिर व दिपमाळीचे बांधकाम हे पुरातन आहे. येथेही भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सध्या या मंदिराची रंगरंगोटी सुरू आहे. पाणी नसल्याने परिसरातील गार्डन वाळले आहे.गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन येथील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शनि मंदिराच्या दर्शनासाठी येणारे भाविकही कमी झाले आहेत. गोदावरील स्रान करून ते दर्शनासाठी जात असतात.४परंतु नदीचे पात्र महिन्यापूर्वीच आटल्याने कोठेतरी साचलेल्या डबक्यांमध्ये अंघोळ करण्याची वेळ भाविक व पर्यटकांवर आली आहे. बाजुलाच असणारे गार्डनही पाण्याावाचून वाळल्याचे दिसते.