देहविक्रीसाठी उझबेकिस्तान, दिल्लीच्या तरुणी छत्रपती संभाजीनगरात; कुख्यात रॅकेटचालक अटकेत

By सुमित डोळे | Published: January 17, 2024 11:55 AM2024-01-17T11:55:45+5:302024-01-17T12:00:25+5:30

प्राध्यापकानंतर देशभरात सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूत अटकेत; उझबेकिस्तानची एक, दिल्लीच्या दोन तरुणीची सुटका

Uzbekistan, Delhi girls in Chhatrapati Sambhajinagar for Prostitution; five arrested | देहविक्रीसाठी उझबेकिस्तान, दिल्लीच्या तरुणी छत्रपती संभाजीनगरात; कुख्यात रॅकेटचालक अटकेत

देहविक्रीसाठी उझबेकिस्तान, दिल्लीच्या तरुणी छत्रपती संभाजीनगरात; कुख्यात रॅकेटचालक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : कॅसिनोत नोकरीच्या बहाण्याने उझबेकिस्तानची २८ वर्षीय तरुणी देशाच्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील टॉप महिला दलाल कल्याणीच्या माध्यमातून ती गेल्या ८ दिवसांपासून शहरात देहविक्री करत होती. बीड बायपास परिसरात बंगल्यात सुरू असलेल्या या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून ५ जणांना अटक केली. विदेशी तरुणीसह दिल्लीच्या २ तरुणींची सुटका केली.

सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजेंद्र राजपूत (४२) व प्रवीण बालाजी कुरकुटे (४३) यांच्यासह अन्य तिघांना यात अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. उच्चशिक्षित प्राध्यापक सुनील रामचंद्र तांबट (५४, रा. एन-७) याने स्वत:च्या ट्यूशनच्या तळमजल्यातच वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे सिडको पोलिसांनी उघडकीस आणले. त्याचा साथीदार संदीप मोहन पवार (३२, रा. जाधववाडी) याच्यासह अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत बीड बायपासवर तुषारच्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटची माहिती पोलिसांना समजली होती. उपायुक्त नवनीत काँवत यांनी कारवाईच्या सूचना केल्या. निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बीड बायपासवरील एका उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यावर डमी ग्राहक पाठवला. वेश्याव्यवसायाची खात्री होताच आत धाड टाकली. त्यानंतर तुषार, प्रवीणसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आल्याचे काँवत यांनी सांगितले.

जूनपर्यंत टुरिस्ट व्हिजावर, १५ पेक्षा अधिक प्रवासाची तिकिटे
२८ वर्षीय तरुणी मूळ उझबेकिस्तानची असून, विवाहित आहे. कॅसिनोमध्ये गलेगठ्ठ पगाराची नोकरी मिळाल्याचे सांगून ती ९ डिसेंबर रोजी दिल्लीत आली. १४ जून, २०२४ पर्यंत तिचा व्हिजिटर व्हिजा मंजूर आहे. दिल्लीत येताच ती सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय झाली. एजंटच्या सांगण्यानुसार दिल्लीच्या २२ व ३० वर्षांच्या मुलींसह ती देशभरात विविध राज्यांमध्ये फिरली. आठ दिवसांपूर्वी पुण्यातील देह व्यापाऱ्यातील कुख्यात कल्याणीने तिघींना बोलावले होते. तुषारच्या मागणीनुसार कल्याणीने त्यांना कारने शहरात पाठवले. तिघींकडे प्रत्येकी १५ पेक्षा अधिक विमानाची तिकिटे आढळून आली.

२० वर्षांपासून एजंट
भारतीय मुलींची ४ हजार तर विदेशी मुलींसाठी ८ ते १० हजार रुपयांमध्ये देहविक्री चालत होती. तुषारच्या मोबाइलमध्ये शहरातील अनेक नामवंत व्यावसायिक, राजकीय पुढाऱ्यांचे नाव आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले. तोच सर्व स्थानिक व्यवहार सांभाळत होता. तुषार, प्रवीणला शेवटचे १७ ऑक्टोबर २०२० रोजी बीड बायपासवर रॅकेट चालवताना अटक झाली होती. त्याच्यावर ६ तर प्रवीणवर ३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या २० वर्षांपासून तुषार सेक्स रॅकेट चालवतो. देशभरातील एजंटसोबत त्याचा संपर्क आहे. मात्र, शहरातील सेक्स रॅकेटमध्ये पहिल्यांदाच पुण्याच्या कल्याणीचे नाव समाेर आले. कारागृहात राहूनही कल्याणी देशभरात सेक्स रॅकेट चालवण्यासाठी कुख्यात आहे.

Web Title: Uzbekistan, Delhi girls in Chhatrapati Sambhajinagar for Prostitution; five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.