शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उडीद घोटाळा; गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By admin | Updated: April 8, 2015 00:54 IST

बीड : बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०११-१२ या वर्षात झालेल्या उडीद घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

बीड : बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०११-१२ या वर्षात झालेल्या उडीद घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सहकारी पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव रा.स. अंटक यांनी पणन संचालक पुणे यांना मंगळवारी दिले आहेत.बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने २०११-१२ या वर्षात उडीद डाळीची खरेदी केली होती. या परिसरात उडीद डाळीचा पेरा नसताना व ४३०० रु. किमान आधारभूत किंमत असताना २८०० रु. दराने खरेदी केली. या खरेदी व्यवहाराची तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवाल दिला होता. तसेच गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली होती. तत्कालीन सरकारने या घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई न करता कोकण विभागीय आयुक्तांकडे फेरविचाराकरीता हे प्रकरण सोपविले होते. याशिवाय बाजार समितीने १४ एकर जुनी जागा जिंकून ३९ एकर १८ गुंठे जमीन खरेदी केली. या जमिनीवरील १४६ गाळ्यांच्या वितरणाचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली होती. आ. विनायक मेटे यांनी २६ मार्च रोजी लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यानंतर पणन राज्यमंत्री राम शिंदे यांनी या अनियमिततेसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग उपसचिवांनी पणन संचालकांना आदेश दिले आहेत.बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद घोटाळा झाल्यानंतर याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर याची संपूर्ण चौकशी करण्यात आली. २०१३ मध्ये गुन्हे दाखल करण्याविषयी शिफारस करण्यात आल्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नव्हती. एका अर्थाने कारवाई करण्यास टोलवाटोलवी केली जात असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात येत होता. तत्कालिन सरकारने या घोटाळ्याच्या आरोपीवर कारवाई न करता फेरविचार करण्याकरीता हे प्रकरण सोपविले होते. यामध्ये बराच कालावधी लोटला गेला. २०११-१२ या वर्षी झालेल्या उडीद घोटाळ्याची कारवाई २०१५ मध्ये होत आहे ही आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल देऊनही कारवाईस दिरंगाई होईल अशा प्रकारची उपाययोजना केली असल्याचे यातून स्पष्ट झाले होते. आ. विनायक मेटे यांनी याबाबतची लक्ष्यवेधी सूचना विधान परिषदेत केली होती. त्यावर उत्तर देताना पणन राज्यमंत्री राम शिंदे यांनी उडीद घोटाळा प्रकरणासह गाळे वाटप व अन्य व्यवहारामधील अनियमिततेच्या सहकार विभागाच्या सहसंचालकामार्फत दोन महिन्यांच्या आत चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. बाजार समितीतील गाळ्यांच्या माध्यमातून समितीला १ कोटी ८५ लाख रुपयांचे उत्पन्न येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८७ लाख २० हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात अनियमितता, झालेली चौकशी, सहकार विभागाच्या सहसंचालकांकडून दोन महिन्यात करून घेण्यात येईल, असेही पणन राज्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता केवळ गुन्हेच दाखल होणार नाहीत तर त्याची सखोल चौकशी होणार आहे. त्याचा इत्थंभूत अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बीड, गेवराई तसेच बीड येथील खरेदी केंद्रावर कार्यरत असलेले सेवक, गेवराई खरेदी-विक्री संघ, बीड खरेदी-विक्री संघ येथील अधिकारी व कर्मचारी, गजानन नागरी सहकारी बँक मर्या. बीड येथील अधिकारी व कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड व गेवराई, संबंधित सज्जाचे तलाठी व सदर गैरव्यवहारात सहभागी असलेले दलाल अन्य इसमाविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे म्हटले आहे. आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी व त्याचा अहवाल शासनास सादर करावा, असे म्हटले आहे.पणन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर तब्बल आठ दिवसानंतर उपसचिव रा.स. अंटक यांनी पणन संचालकांना मंगळवारी पत्र लिहिले. मुळात विधान परिषदेत घोषणा झाल्यानंतर तात्काळ कारवाई होणे आवश्यक होते. ४उपसचिवांनी पणन संचालकांना दिलेल्या आदेशानंतर आता पुढील कारवाईवर सर्वाचे लक्ष लागले आहे. पणन संचालक विभागाचे अधिकारी व कर्मचारी थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करतात ही पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून कारवाईची प्रक्रिया पूर्ण करतात हे आता पुढील काळात पहावयाला मिळणार आहे. ४मंगळवारी दिलेल्या आदेशामुळे या घोटाळ्यातील सर्वच दोषींवर कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे मार्केटींग अधिकारी ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांवरच कारवाई होणार असल्यामुळे याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.