शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अपडाऊन तलाठ्यांचा वसमतला सामूहिक सज्जा

By admin | Updated: June 26, 2014 00:40 IST

वसमत : तालुक्यातील बहुतेक तलाठी नांदेड, परभणी, हिंगोली आदी शहरातून अपडाऊन करतात. सवड मिळाली तर महिन्यातून एखादेवेळी सज्जाला भेट देऊन येतात.

वसमत : तालुक्यातील बहुतेक तलाठी नांदेड, परभणी, हिंगोली आदी शहरातून अपडाऊन करतात. सवड मिळाली तर महिन्यातून एखादेवेळी सज्जाला भेट देऊन येतात. काही तलाठ्यांनी वसमत जवळच सामूहिक सज्जे उभारले आहेत. येथे बसूनच ते सज्जाचे कामकाज करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. तालुक्यात एकूण ३६ तलाठी सज्जे आहेत. प्रत्येक तलाठ्याने सज्जाच्या मुख्यालयी राहावे व सर्व कामे मुख्यालयीच करावीत, असा नियम आहे; परंतु वसमत तालुक्यातील एकही तलाठी सज्जाच्या ठिकाणी राहत नाही. हा प्रकार बुधवारी ‘लोकमत’ च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला आहे. बहुतेक तलाठी सज्जे हे तलाठ्यांच्या घरीच वसमत येथे आहेत. अनेक तलाठी तर बाहेरच्या जिल्ह्यात वास्तव्यास असून, सवडीप्रमाणे ते वसमतला येतात. सज्जावर तर महिनोगणती अनेक तलाठी फिरकतही नसल्याचेही समोर आले आहे. आसेगाव तलाठी सज्जास सदर प्रतिनिधीने बुधवारी सकाळी ९ वाजता भेट दिली असता महसूल विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला. आसेगाव सज्जाच्या तलाठी श्रीमती कोहर या गेल्या महिनाभरापासून आसेगावकडे फिरकल्याही नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अन्न सुरक्षा योजनेची यादी वाचण्यासाठी त्या एकदा तासभरासाठी आसेगावात आल्या होत्या. ग्रामस्थांना तलाठ्यास भेटण्यासाठी वसमत येथे श्रीस्वामी समर्थ मंदिरामागे असलेल्या त्यांच्या कार्यालयात जावे लागते. तेथेही त्या कधी येतील हे नक्की नसते. अनेकदा दिवसभर थांबून ग्रामस्थांना रिकाम्या हातानेही परतावे लागते. अत्यंत लहरी कारभार असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. सदर प्रतिनिधीने ११ वाजता टाकळगव्हाण येथे भेट दिली असता तेथील तलाठी पुजारी हे गावाकडे कधी तरी येतात. गरजू ग्रामस्थांना त्यांना शोधण्यासाठी वसमतला चकरा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. सदर प्रतिनिधीने साडेअकरा वाजता आसेगाव सज्जाच्या तलाठी कोहर यांच्या वसमत येथील खासगी कार्यालयास भेट दिली असता ते कुलूप बंद होते. आसेगाव येथील अनेक ग्रामस्थ कार्यालयाबाहेर ताटकळत उभे होते. मॅडम ३ वाजता येतील, असे तेथील एका एजंटने सांगितले. सदर प्रतिनिधी २ वाजता पुन्हा त्या कार्यालयाकडे गेला असता धक्कादायक प्रकार समोर आला. कोहर यांच्या खासगी कार्यालयातच इतर अनेक तलाठ्यांचेही कार्यालय असल्याचे पहावयास मिळाले. कार्यालयात शालेय प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आसेगाव, सुनेगाव आदी भागातील पालक महिला, पालकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. तलाठी कोहर यांना आसेगाव सज्जावर का जात नाहीत, असे विचारले असता त्यांनी कोणाचे काम अडते काय? असा प्रतिप्रश्न केला. ग्रामस्थांना वसमतला येण्याचा भुर्दंड बसतो, असे सदर प्रतिनिधीने विचारले असता तलाठी मॅडम म्हणाल्या की, भुर्दंड कसा खेड्याचे लोक उठले की वसमतला येतात मग तलाठ्याला भेटण्याचाच भुर्दंड कशाचा? असा प्रश्न त्यांच्या कार्यपद्धतीची साक्ष देणारा होता. त्यांच्या कार्यालयामागच्या खोली बाहेरही ग्रामस्थ बसलेले होते. त्यांच्याशी चर्चा केली असता ते गुंडा, करंजी या भागातील असल्याचे समजले. तेथे गुंडा सज्जाचे तलाठी भद्रे यांचे कार्यालय आहे. तलाठी भद्रे गावाकडे येत नाहीत. येथेच स्वाक्षरीसाठी यावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याच शेजारी इतर दोन खोल्या कुलूपबंद होत्या. त्यातही तलाठी कार्यालयच असल्याचे समोर आले. येथे कार्यालय असलेले बहुतेक तलाठी नांदेड, परभणीहून अपडाऊन करणारे आहेत. तलाठ्यांचे हे खासगी सज्जे वजा सामुहिक संपर्क कार्यालय नावाचा प्रकार महसूल विभागात तलाठी कसा कामकाजाचा बोजवारा उडवत आहेत. (वार्ताहर)कोण, कोठून ये-जा करते...वसमत तालुक्यातील बाभूळगाव, हयातनगर सज्जाचे तलाठी विभूतदार, हट्टा येथील तलाठी गिते, अकोलीचे तलाठी दिक्षीत हे परभणीहून अपडावून करतात. आसेगाव सज्जाच्या तलाठी कोहर, कौठ्याचे तलाठी तेलेवार, रिधोऱ्याचे इंगोले, जोंधळे व कुरूंदवाडी, पळसगाव सज्जाचे तलाठी नांदेडहून अपडाऊन करतात. करंजाळाचे आडे, पांगरा शिंदेचे मुंडे, आंबा सज्जाचे डुकरे हे तलाठी हिंगोलीहून अपडाऊन करत असतात. यांच्यासह इतरही अनेक तलाठी विविध गावातून अपडाऊन करतात. तालुक्यातील सज्जाच्या ठिकाणी अधिकृत सज्जा कार्यालयेही तलाठ्यांची नाहीत. अनेक तलाठ्यांनी खासगी कर्मचारी लावून ‘कारभार’ सुरू केला आहे. अपडाऊन करणारे तलाठ्यांचे मोबाईल स्विचआॅफ किंवा नॉट रिचेबल असतात. त्यामुळे अशा तलाठ्यांना शोधता शोधता ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या पालकांना पायपीट करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र बुधवारी पहावयास मिळाले.