शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

बेमोसमी पावसाचा फटका आता भाजीमंडईला; आज कोणती भाजी खरेदी करावी; हा गृहिणींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:00 IST

अडत बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ५० टक्क्याने कमी झाली आहे. याचा परिणाम थेट शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजीमंडईत पाहण्यास मिळाला.

छत्रपती संभाजीनगर : बेमोसमी पावसाने शेतातील पिकांची वाट लावून टाकली... शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. आता याची झळ भाजीमंडईत जाणवू लागली आहे. पालेभाज्या असो वा फळभाज्यांचे भाव वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील गृहिणींचे महिन्याचे गणित बिघडू लागले आहे. ‘आज कोणती भाजी खरेदी करायची,’ असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.

५० टक्क्याने आवक घटलीजाधववाडी अडत बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ५० टक्क्याने कमी झाली आहे. याचा परिणाम थेट शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजीमंडईत पाहण्यास मिळाला. कोथिंबीर जुडी २० रुपये, तर ४० रुपये भेलापर्यंत जाऊन पोहोचली आहे. पालक २५ रुपये जुडी म्हणजे पहिल्यांदा मेथीपेक्षा १० रुपयांनी पालक भाजी जास्त भावात विकत आहे.

भाजी----- २५ ऑक्टोबर -- १० नोव्हेंबरकोथिंबीर १० रु. --- २० रु. (जुडी)कोथिंबीर भेला ३० रु. --- ५० रु.मेथी             १० रु. --- २० रु.पालक             १५ रु.-- २५ रु.शेपू             १० रु. -- २० रु.करडी             १० रु. -- १५ रु.

फळभाज्यांचे दर किलोप्रमाणेकाकडी            ३० रु. --६० रु.गवार            १०० रु. -- १४० रु.शेवगा शेंग १०० रु. -- १६० रु.दोडके            ६० रु. -- १०० रु.वांगे             ७० रु. -- १२० रु.शिमला मिरची ६० रु. -- ८० रु.कांदा            २० रु. -- ३० रु.बटाटा ३० रु. -- ४० रु.फुलकोबी ६० रु. -- ८० रु.बिन्स ८० रु. -- १२० रु.भेंडी ८० रु. -- १०० रु.

महिनाभर अशीच परिस्थितीबेमोसमी पावसाने भाज्या खराब झाल्या. त्याचा परिणाम आता भाजीमंडईत तीव्रतेने जाणवत आहे. या महागाईला लग्नसराईची जोड मिळाली आहे. आणखी महिनाभर अशीच परिस्थिती राहील.- संजय वाघमारे, भाजीविक्रेता

कोणती भाजी खरेदी करावी प्रश्नमुलांना भेंडीची भाजी सर्वाधिक आवडते, पालेभाज्या नकोच म्हणतात. मात्र, सध्या सर्वच भाज्या महागल्या आहेत. शेतकऱ्यांना बेमोसमी पावसाचा जसा फटका बसला तो मोठा आहे. पण आमचेही घरगुती बजेट बिघडले आहे. उद्या कोणती भाजी खरेदी करायची, असा प्रश्न पडत आहे.- वैशाली देशपांडे, गृहिणी

English
हिंदी सारांश
Web Title : Untimely Rains Hit Vegetable Markets; Housewives Question What to Buy.

Web Summary : Untimely rains damaged crops, impacting vegetable market prices. Leafy and other vegetable rates surged, disrupting household budgets. Housewives struggle to decide which vegetables to purchase amidst rising costs.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीRainपाऊस