भाजीपाल्याला अवकाळी पाऊस, उष्णतेचा फटका; दरात किलोमागे ८० रुपयांपर्यंत वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Published: May 9, 2024 11:45 AM2024-05-09T11:45:19+5:302024-05-09T11:45:44+5:30

भाजीमंडईत फळभाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

Unseasonal rains, heat damage to vegetables; Increase in price to Rs 80 per kg | भाजीपाल्याला अवकाळी पाऊस, उष्णतेचा फटका; दरात किलोमागे ८० रुपयांपर्यंत वाढ

भाजीपाल्याला अवकाळी पाऊस, उष्णतेचा फटका; दरात किलोमागे ८० रुपयांपर्यंत वाढ

छत्रपती संभाजीनगर : मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व आता उष्णतेची लाट याचा फटका भाज्यांना बसला आहे. लवकर भाज्या खराब होत असल्याने भाजीमंडईत फळभाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

फळभाज्यांमध्ये श्रावणघेवडा (बिन्स) जास्त भाव खात आहे. आठवडाभरापूर्वी १२० रुपये किलोने विक्री होणारी ही भाजी सध्या १८० रुपये किलोने विकली जात आहे. म्हणजे ८ दिवसांत किलोमागे ६० रुपयांनी भाववाढ झाली आहे. पावभाजी व पुलाव तयार करण्यासाठी श्रावणघेवड्याचा वापर केला जातो.

टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्त
फळभाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्त म्हणजे २५ रुपये किलोने विकत आहे. बटाटा, काकडी, पत्ताकोबी ४० रुपये किलोने विकत आहे.

मेथी २० रुपये जुडी
उष्णतेमुळे पालेभाज्याही लवकर खराब होत आहेत. यामुळे पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत. ८ दिवसांपूर्वी १५ रुपये जुडी विक्री होणारी मेथी भाजी सध्या २० रुपयांत मिळत आहे. तर १० रुपयांना मिळणारी पालक, करडी, चुका, कोथिंबीर सध्या १५ रुपये प्रति जुडी विकत आहे.

ओल्या पोत्यात झाकून ठेवत आहेत भाज्या
उष्णतेची लाट सध्या सुरू आहे. भाज्या वाळून जाऊ नयेत, भाजी ताजी दिसावी यासाठी विक्रेत्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. कोणी थोड्या थोड्या वेळाने भाज्यांवर पाण्याची फवारणी करत आहे तर काही विक्रेते पाण्यात भिजविलेली पोती भाज्यांवर ठेवत आहेत. यासाठी विक्रेत्यांना दिवसभर सतत लक्ष ठेवावे लागत आहे.
-विजय वाघमारे, भाजी विक्रेता

आठवड्याभरात वाढले भाव
फुलकोबी ६०रु---८०रू
गवार ६०रु---८०रु
वांगे ४०रु---८०रु
शेवगा शेंगा ४०रु---८०रु
शिमला मिरची ६०रु---८०रु
भेंडी ६०रु---८०रु
गवार ६०रु---८०रु
पत्ताकोबी ३०रु---४०रु

Web Title: Unseasonal rains, heat damage to vegetables; Increase in price to Rs 80 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.