IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?

प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झालेल्या आरसीबीने चेन्नईला पराभूत करून प्ले ऑफचे तिकीट मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 02:23 PM2024-05-20T14:23:45+5:302024-05-20T14:27:28+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2024 updates rcb women's captain Smriti Mandhana said, Watching a RCB match is much more stressful than playing   | IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?

IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Smriti Mandhana On RCB : आयपीएलच्या सतराव्या हंगामात एकेकाळी स्पर्धेबाहेर होण्याची टांगती तलवार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने असामान्य कामगिरी केली. प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झालेल्या आरसीबीने चेन्नईला पराभूत करून प्ले ऑफचे तिकीट मिळवले. चेन्नई सुपर किंग्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला. आरसीबीने अखेरचे सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये प्रवेश केला. खरे तर पहिल्या ७ सामन्यांनंतर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची फक्त १ टक्के आशा उरली होती. चेन्नई आणि बंगळुरू हा सामना पाहण्यासाठी आरसीबीच्या महिला शिलेदारांनी हजेरी लावली होती. महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीची कर्णधार असलेल्या स्मृती मानधनाने आरसीबीच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला. (IPL 2024 News) 

स्मृती मानधना, रिचा घोष, श्रेयांका पाटील आणि आशा सोभना या आरसीबीच्या महिला संघाच्या खेळाडू चिन्नस्वामी स्टेडियमवर उपस्थित होत्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारी जेमिमा रॉड्रिग्ज देखील दिसली. आरसीबीच्या पॉडकास्टवर बोलताना स्मृती म्हणाली की, आरसीबीकडून खेळण्यापेक्षा त्यांना खेळताना पाहणे खूप कठीण आहे. कारण सामना पाहताना खूप तणाव असतो. आमच्या पुरूष संघाने ज्या प्रकारे कमबॅक केले आणि जी टक्कर दिली ते पाहून आनंद वाटला. त्यांनी केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आम्ही सर्वांनी एकत्र सामना पाहिला यामुळे आनंद द्विगुणित झाला. 

भारतीय महिला संघाची आघाडीची फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सची शिलेदार जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली की, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहणे ही एक आनंदाची बाब आहे. धोनी पुढच्या हंगामात खेळताना दिसेल की नाही याबाबत कल्पना नाही. पण, चिन्नस्वामी स्टेडियमवर एकवटणारे चाहते इतर कुठे पाहायला मिळतील असे वाटत नाही. 

दरम्यान, आरसीबी स्पर्धेबाहेर झाली असे वाटत असताना फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील संघाने कमाल केली. पहिल्या ७ सामन्यांनंतर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची फक्त १ टक्के आशा उरली होती. पण नंतरच्या काही सामन्यांमध्ये संघाने असामान्य कामगिरी केली. विराट कोहली, विल जॅक्स, यश दयाल, दिनेश कार्तिक आणि स्वप्निल सिंग या शिलेदारांनी आरसीबीसाठी चमक दाखवली.

Web Title: ipl 2024 updates rcb women's captain Smriti Mandhana said, Watching a RCB match is much more stressful than playing  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.