शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

अवकाळी पावसाने वार्षिक धान्य खरेदी मंदावली, ग्राहकांचे ' वेट अँड वॉच'

By प्रशांत तेलवाडकर | Published: May 02, 2024 7:25 PM

नवीन धान्यास उन्ह दाखवावे लागते मात्र अवकाळी पाऊस कधी येईल याचा अंदाज नसल्याने ग्राहक सध्या खरेदीस थांबले आहेत

छत्रपती संभाजीनगर : ढगांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. अशा वातावरणात धान्य वाळविता येत नाही. यामुळे वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांनी ‘थांबा व वाट पहा’ अशी भूमिका घेतल्याने जाधववाडी कृउबा व जुन्या मोंढ्यातील उलाढालीला ‘ब्रेक’ लागला आहे.

गहू, ज्वारीला दाखवावे लागते कडक ऊननवीन गहू व ज्वारी खरेदी केल्यानंतर त्यास कडक उन्हात ठेवावे लागते. त्यामुळे धान्यातील ओलसरपणा निघून जातो व मग वर्षभर त्या धान्याला कीड लागत नाही. यामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात वार्षिक धान्य खरेदी केली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस कधी येईल याचा अंदाज नसल्याने धान्य वाळत टाकले व ते पावसात भिजले तर खराब होण्याची व नंतर किड लागण्याची दाट शक्यता असते.

गहू, ज्वारीचे भाव वधारलेअवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, गुजरात राज्यातही बसला आहे. यामुळे धान्याची आवक थंडावली आहे. अनेक भागांत शेतात पीकांचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम धान्याच्या भाववाढीवर झाला आहे. मागील आठवडाभरात गव्हात क्विंटलमागे १०० ते १२० रुपयांनी वाढ होऊन ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. ज्वारीही २०० ते ३०० रुपयांनी वधारुन ३५०० ते ४५०० रुपये क्विंटल विकली जात आहे.-निलेश सोमाणी,व्यापारी

आवश्यकतेनुसार धान्य खरेदीमागील दोन वर्षे अवकाळी पाऊस व नंतर पावसाळ्यात शेवटच्या टप्यात झालेल्या मुसळधार पावसाने धान्यात ओलावा निर्माण होऊन गहू व ज्वारीला किडे लागले होते. वार्षिक धान्य साठवून ठेवणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसला होता. त्यामुळे यंदा वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच महिन्याला आवश्यकतेनुसार धान्य खरेदी करणे पसंत केले असल्याने वार्षिक धान्याच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊसAurangabadऔरंगाबाद