विद्यापीठ सिनेट निवडणूक: उत्कर्ष पॅनलचे राखीव गटातील पाचही जागांवरील उमेदवार विजयी

By संतोष हिरेमठ | Published: November 29, 2022 12:49 PM2022-11-29T12:49:11+5:302022-11-29T12:53:02+5:30

उर्वरित ५ जागांचा निकाल सायंकाळी  लागण्याची शक्यता आहे.

University Senate Election: Utkarsh Panel Candidates Win All Five Seats From Reserved Group | विद्यापीठ सिनेट निवडणूक: उत्कर्ष पॅनलचे राखीव गटातील पाचही जागांवरील उमेदवार विजयी

विद्यापीठ सिनेट निवडणूक: उत्कर्ष पॅनलचे राखीव गटातील पाचही जागांवरील उमेदवार विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीधर मतदार संघातील १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे पाचही राखीव गटातील उमेदवार विजयी झालेले आहे.

एससी संवर्गातून सुनील मगरे, एसटी संवर्गातून सुनील निकम, ओबीसी संवर्गातून सुभाष राऊत, व्हीजेएनटी संवर्गातून दत्तात्रेय भांगे आणि महिला संवर्गातून पुनम पाटील विजयी झाले आहेत.

या १० जागांच्या मतमोजणी प्रक्रिया सोमवारी  सकाळी १० वाजता सुरु झाली. उर्वरित ५ जागांचा निकाल सायंकाळी  लागण्याची शक्यता आहे. क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, अधिकारी, निरीक्षक, निवडणूक सल्लागार समितीचे सदस्य, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले.

Web Title: University Senate Election: Utkarsh Panel Candidates Win All Five Seats From Reserved Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.