विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 12:38 IST2020-10-02T12:37:47+5:302020-10-02T12:38:23+5:30

विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन गुरूवारी सायंकाळी तूर्त स्थगित करण्यात आले आहे. 

University employees' agitation postponed | विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

औरंगाबाद : विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन गुरूवारी सायंकाळी तूर्त स्थगित करण्यात आले आहे.  उच्च  व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासोबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची  गुरूवारी बैठक झाली. यादरम्यान आंदोलन स्थगित करण्यात  आल्याची  माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या चार मागण्यांसह अन्य दोन मागण्यांची पूर्तता त्वरित करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून मिळाले असून उर्वरित  तीन मागण्या त्वरित पूर्ण करणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे संयुक्त कृती समितीने लेखणी बंद आंदोलन स्थगित केले असून  मागण्यांची  पूर्तता करण्यात आली नाही तर दि. १९ ऑक्टोबरपासून हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा कृती समितीने दिला. 

Web Title: University employees' agitation postponed