शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

बामु विद्यापीठ वसतिगृह प्रवेशक्षमता दीडपट वाढली

By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतिगृहाची प्रवेशक्षमता यावर्षीपासून दीडपट वाढली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतिगृहाची प्रवेशक्षमता यावर्षीपासून दीडपट वाढली आहे. चालू शैक्षणिक वर्षी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या ५०० विद्यार्थी क्षमता असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यातील बहुतेक विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नसल्याने ते वसतिगृहात राहत असतात. विद्यापीठातील विविध वसतिगृहांत एक हजार विद्यार्थी राहू शकतील एवढीच क्षमता होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नव्हता. त्यांना विद्यापीठाबाहेर घर भाड्याने घेऊन राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने केलेल्या मागणीनंतर अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र ५०० खोल्यांचे वसतिगृह मंजूर केले. त्यासाठी ४ कोटी ८४ लाख ६८ हजार रुपयांचा निधीही मंजूर केला होता. २४ जानेवारी रोजी या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. नुकतेच वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तेथील प्रत्येक खोलीमध्ये तीन मुलींची व्यवस्था करण्यात आली असून वॉर्डनचे कार्यालय, सीक रूम, कॉम्प्युटर रूम, अपंगांसाठी स्वतंत्र खोली आदी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.