शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित बियाणे; कारवाईस टाळाटाळ

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

हिंगोली : उगवणक्षमता कमी असतानादेखील सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आलेला नाही. शिवाय अशी बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांना नावाला थातूरमातूर कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या.

हिंगोली : उगवणक्षमता कमी असतानादेखील सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आलेला नाही. शिवाय अशी बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांना नावाला थातूरमातूर कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या. परिणामी, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अप्रमाणित बियाणे विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यात कापसाऐवजी सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा कृषी विभागाने ४० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचे सांगितले होते. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर आधीच बियाणे लागणार होते. आधीच जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाणाचा तुटवडा होता. त्यात महाबीजचे बियाणे उगवणशक्तीत पास झाले नाही. म्हणून खाजगी कंपन्यांच्या बियाण्यावर उत्पादकांना अवलंबून राहावे लागले. शिवाय मागील वर्षी काढणीच्या हंगामात पाणी पडल्यामुळे सोयाबीन पेरणीयोग्य राहिले नव्हते. त्यात काही खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता फारच कमी होती. आशा कंपन्यांचे बियाणे विक्रीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रोख लावला नाही. २५ टक्केच्या आज जर्मीनेशन असताना देखील ते बियाणे सर्रास विक्री झाले. गुणवत्ता निरीक्षकांनी मोठ्या प्रमाणात तपासणी केली. तपासणीअंती ३० टक्क्यांच्या आत मोठ्या प्रमाणात बियाणे आढळून आले; परंतु या बियाण्यांची विक्री थांबविण्यात आली नाही. शिवाय ही बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रांवर देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. थातूरमातूर कार्यवाही करून भागविण्यात आले. परिणामी, विक्री झालेल्या बियाण्यांच्या नुकसानीला उत्पादकांना सामोरे जावे लागणार आहे.प्रमाणित बियाण्यांचीच विक्रीनमूना काढल्यानंतर अप्रमाणित बियाणे आढळल्यास त्याची विक्री थांबविण्यात येते. त्यावेळी काही कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटिसाही दिल्या आहेत. त्यामुळे प्रमाणित बियाण्यांचीच विक्री झाली आहे. काही केंद्राच्या कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहेत. विभागीय कार्यालयाकडून निकाल आल्यानंतर त्यांच्याविरूद्ध कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली. (प्रतिनिधी)कमी उगवणक्षमतेचे सोयाबीन बियाणेकंपनीचे नाव नमुनाकाढलेले केंद्र उगवण क्ष. बॅगा अंकुर सिड्सबाबा रामदेव कृषी केंद्र ३० % ७५ श्री दादाजी सिड्सओम कृषी केंद्र २९ १८५कृषीधन सिड्सओम कृषी केंद्र २० २६७सिद्धार्थ सिड्ससुशील कृषी केंद्र २१ २८कृषीधन सिड्सअशिष कृषी केंद्र २० ७०कृषीधन सिड्सगोपाल पेस्टीसाईड्स २८ ३७ग्रीनगोल्ड सिड्सश्रीनीवास अ‍ॅग्रो ए. ३० १४०अंकुर सिड्सबाबा रामदेव कृषी केंद्र ३० १००अंकुर सिड्सपातूरकर अ‍ॅन्ड सन्स ३० २६२आजवाई सिड्सवाय.आर. हलगे केंद्र २८ ३७कृषीधन सिड्सगोपाल पेस्टीसाईड्स २० १५७कृषीधन सिड्सजयकिसान सिड्स २५ १७०एमएसएससीएयादव हलगे कृषी केद्र १५ २३सेठी सिड्समे.अदित्य अ‍ॅग्रो २४ ५०