शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडमध्ये शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता

By admin | Updated: July 29, 2014 01:14 IST

औरंगाबाद : कन्नडच्या आमदारावरून शिवसेनेत सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची अवस्था संभ्रमित झाली आहे.

औरंगाबाद : कन्नडच्या आमदारावरून शिवसेनेत सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची अवस्था संभ्रमित झाली आहे. आमदाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या इतर २४ पदाधिकाऱ्यांपैकी आणखी काही जणांविरुद्ध कारवाईची कुऱ्हाड चालणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदाराविरुद्ध तक्रार केली म्हणून कन्नडचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आल्यामुळे तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी लोकमत कार्यालयास दूरध्वनी करून संतप्त भावना व्यक्त केल्या. घोसाळकरांना पूर्वकल्पनाआमदाराने स्थानिक पदाधिकाऱ्याला दिलेल्या धमकीची तक्रार कन्नडच्या त्या २५ पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यापूर्वी मराठवाड्याचे संपर्कप्रमुख आ. विनोद घोसाळकर यांच्याकडेही केली होती. ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलेले निवेदन घोसाळकरांनाही देण्यात आले होते. घोसाळकरांच्या उपस्थितीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्याची चौकशी करण्याचे ठरले होते, असे बैठकीला उपस्थित सूत्रांनी सांगितले. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रमुखांपैकी कन्नडचे तालुकाप्रमुख डॉ.अण्णा शिंदे यांना संपर्क साधला असता, आमचे म्हणणे आम्ही पक्षाकडे मांडले आहे, असे सांगून त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. कारवाईची टांगती तलवारनिवेदनावर स्वाक्षरी करणारे कन्नड तालुक्यातील २५ प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यातील अन्य काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने चालविला आहे. परंतु राठोडविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा रोष शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरिकांतून व्यक्त होत असल्यामुळे सध्या सदर कारवाई रोखण्यात आली आहे. असे असले तरी हा रोष कमी होताच पुन्हा कारवाईची कुऱ्हाड चालविली जाण्याची भीती या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होते आहे. ४परंतु याविषयी कुणीही समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता बहुतांश जणांनी आपण मुंबईत असल्याचे सांगून फोन स्वीच आॅफ केले.