शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळ कनेक्शन आजपासून तोडणार

By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST

औरंगाबाद : मनपाने पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीचे खाजगीकरण केले असून कंत्राट घेणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी उद्या ६ डिसेंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेणार आहे

औरंगाबाद : मनपाने पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीचे खाजगीकरण केले असून कंत्राट घेणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी उद्या ६ डिसेंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेणार आहे. या भागात सुमारे २०० हून अधिक नळ अनधिकृत असल्याची माहिती समोर आली असून कंपनी ते नळ उद्या तोडणार आहे. १ सप्टेंबरपासून कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम करणे आणि पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले. शनिवारी कंपनीची पहिली कारवाई होत आहे. नळ तोडण्यावरून नागरिक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘राडा’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १५ दिवसांपूर्वी त्या भागातील नागरिकांना नोटिसा बजावून नळ अधिकृत करण्यास सांगण्यात आले होते; मात्र अनधिकृत नळधारकांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नळ तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सध्या ४० टक्के पाण्याची चोरी होत आहे. त्याचा फटका अधिकृत नळधारकांना बसत आहे. मनपाचे मोठे नुकसान होत आहे. पाणीपुरवठा बायलॉजच्या १२.४ नुसार ही नळ तोडण्याची कारवाई होणार आहे, असे कंपनीने कळविलेआहे. डी. डी.अथवा रोख रक्कमडी. डी. अथवा रोख रक्कम दिली, तरच टँकर अथवा नळ कनेक्शन जोडले जाईल. धनादेश स्वीकारले जाणार नाहीत, असा नियम कंपनीने तयार केला आहे. गुंठेवारी भागातील टँकरसाठी रोख रक्कमच नागरिकांना द्यावी लागत आहे. टँकरने वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे.वेळापत्रक कोलमडले पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शुक्रवारी अनेक भागांमध्ये उशिरा पाणीपुरवठा झाला, तर काही भागांत ३० मिनिटेच पाणीपुरवठा झाला. महावितरणकडून पाणी येण्याच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कॉल सेंटर, तेथील संबंधितांचे संपर्क क्रमांक कंपनीने प्रसिद्धीस दिलेले नाहीत. त्यामुळे गारखेडा भागात अर्धा तास वीजपुरवठा नव्हता. ज्या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्या भागातील नागरिक विद्युत मोटारी लावून पाणी भरतात. वीज नसल्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यासाठी अनेक अडचणी आल्या.