तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 20:50 IST2023-04-02T20:50:24+5:302023-04-02T20:50:42+5:30

'आमच्या पक्षाचे चिन्ह चोरले, पक्ष चोरला आणि आता माझे वडिलही चोरायला निघाले आहेत. '

Uddhav Thackeray; You take Modi with you, I enter the field in my father's name; Uddhav Thackeray's Open Challenge | तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज

तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज


छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मेबबुबा मुफ्तींसोबत काय करत होता. आम्ही सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचं काय चाटतंय? लालू-नितीश यांचं सरकार पाडून तुम्ही नितीश यांचं काय चाटलं? मेघालयातील सरकारवर आरोप केले आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, अमित शहा तुम्ही आता संगमांचं काय चाटताय? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. 

ते पुढे म्हणाले, आज माझ्याकडे काहीच नाही, संकटाच्या काळात कोण मदतीला येतं? आमच्या पक्षाचे चिन्ह चोरले, पक्ष चोरला आणि आता माझे वडिलही चोरायला निघाले आहेत. एकनाथ शिंदेंना बाप सुद्धा दुसऱ्याचा लागतो, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, अकाली दल, शिवसेनेला भाजपनं वापरून घेतलं, आता त्यांना आपल्याला सत्तेवरून खाली खेचायचंय. पण, शिवसेनेचा जन्म भाजपची पालखी वाहायला झालेला नाही, असंही ते यावेली म्हणाले.

आमचे विचार स्पष्ट आहेत, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. काश्मिरमध्ये अतिरेक्यांना टिपणाऱ्या औरंगजेबला हालहाल करुन मारण्यात आलं, देशासाठी शहीद झालेला औरंगजेब देशासाठी शहीद झाला. अश्फाक उल्लाह खान देशासाठी फाशीवर गेले. अनेक धर्मातील लोकांनी देशासाठी प्राण अर्पण केले. जे काम मी घरात बसून केलं ते तुम्ही सूरत, गुवाहाटीला फिरुनही करू शकणार नाही. तुम्ही मोदींना सोबत घ्या मी माझ्या वडिलांच्या नावानं मैदानात येतो, असे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Uddhav Thackeray; You take Modi with you, I enter the field in my father's name; Uddhav Thackeray's Open Challenge