ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:55 IST2019-03-22T21:54:37+5:302019-03-22T21:55:00+5:30
बायपासवर अपघात रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून विविध उपायायोजना सुरू असताना गुरूवारी दुपारी अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
औरंगाबाद : बायपासवर अपघात रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून विविध उपायायोजना सुरू असताना गुरूवारी दुपारी अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
चंद्रकांत दत्तात्रय भुंगे (वय ६३,रा. बंबाटनगर)असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रकांत हे २१ मार्च रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास म्हस्के पेट्रोलपंपाकडून देवळाई चौकाकडे मोटारसायकलने जात होते. यावेळी मागून सुसाट जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिल्याने ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. यात चंद्रकांत यांच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने घटनास्थळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रत्यक्षदर्र्शींनी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री पाऊण वाजेच्या सुमारास त्यांचा अंत झाला. अतिरक्तस्त्राव झाल्याने चंद्रकांत यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.